तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 1500 स्पर्धक धावणार
तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 1500 स्पर्धक धावणार
मान्यवरांच्या उपस्थित 29 ऑक्टोबरला होणार मॅरेथॉन मॅरेथॉनची तयारी पुर्ण.
बीड प्रतिनिधी :- बालाघाटच्या निसर्गरम्य वातावरणात सर्वांना आरोग्यदायी अनुभव घेता
यावा या उद्देशाने बीड मधील योगा प्रतिष्ठाणच्या वतीने दुसऱ्या वर्षी पण तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन 29 ऑक्टोबरला करण्यात आले असुन या स्पर्धेमध्ये राज्यातील व विविध राज्यातुन 1500 हुन अधिक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी केली असुन या मॅरेथॉनची तयारी अंति टप्प्यात आली असुन याची माहिती योगा प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आली आहे.
डोंगराळ भाग, घाटातील वळण रस्ता, वन्यप्राणी, घाटात असलेली सह्याद्री देवराई मधील वनराई यामुळे प्रसिध्द असलेले ठिकाण असुन या वातावरणामुळे आरोग्या साठी लाभदायक असल्याने याभागात सकाळी मार्गांग वॉक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बीड मधील योगा प्रतिष्ठाणच्या वतीने सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या धर्तीवर या भागात पण तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन चे आयोजन केले आहे. 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6.00 वा. पालवण गावाच्या काही अंतरावरती असलेल्या मोकळ्या जागेत तिरुमला हिल हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे दुग्ध विकास आयुक्त, श्री. अजित पवार, जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे मॅडम, पोलीस अधिक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, चंपावती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मा. आ. श्री. अमरसिंह पंडीत, अप्पर जिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वासुदेव सोळंके, क्रीडा अधिकारी श्रीमती. देशमुख मॅडम, जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे, डॉ. नागेश चव्हाण, पोलीस उपअधिक्षक श्री. संतोष वाळके, तहसिलदार, श्री. सुहास हजारे आणि खेळाडु अक्षय शिंदे, रणजी क्रिकेट खेळाडू सौरभ नवले, यश जाधव व योगा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी या मॅरेथॉन स्पर्धेत प्रमुख अधिकारी धावणार आहेत. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी 10 कि.मी. साठी आपली नाव नोंदणी केली आहे
मॅरेथॉनच्या माध्यमातून बीडच्या सह्यादी देवराईचा लौकीक राज्यभर व्हावा असा आयोजकाचा प्रयत्न राहणार आहे. या योगा प्रतिष्ठाणचे सदस्य हे राज्यभर किंवा राज्यबाहेर होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा किंवा सायकलिंग स्पर्धा यामध्ये सातत्याने भाग घेत असतात, काही जणांनी आयर्नमॅन, कॉम्रेड या देशाबाहेरील स्पर्धेमध्ये सुध्दा सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेच्या मार्गावरती चेअरींग टीम सर्धकांना प्रोत्साहन देणार असुन ढोलताशा, पारंपारिक वाद्य वाजवून स्पर्धकांचा उत्साह वाढविला जाणार आहे. या भागातील नागरिक सुध्दा रस्त्याच्या कडेला उभे राहुन धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत. तसेच या धावपटूंना प्रत्येक कि.मी. मध्ये पाण्याची बॉटल, केळी व एनर्जल, मेडीकल कीट, स्प्रे आदि साहित्य उपलब्ध असणार आहे. ही स्पर्धा सकाळी 21 कि.मी. धावणारे स्पर्धेक 6.00 वा., 10 कि.मी. धावणारे 6.10 वा. व 5 कि.मी. धावणारे 6.20 वा. या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनचा झेंडा दाखविला जाईल, त्याआधी सकाळी 5.30 वा. वॉर्मअप साठी झुंबा डान्स होणार आहे आणि नंतर स्पर्धेला सुरुवात होईल, या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटामध्ये महिला - पुरुष यांना प्रथम, व्दितीय, तृतीय अशी अडीच लाखाची बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेच्या मार्गावर लागणारी अॅब्युलन्स सेवा, पोलीस बंदोबस्त सेवा आदि प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये नोंदणी केली आहे, अशा स्पर्धेकांसाठी 28 ऑक्टोंबर रोजी बीडमधील राजयोग मंगल कार्यालयात रनिंग कीट दिली जाणार आहे. त्यामध्ये टी शर्ट, गुडीबॅग, टाईमचिप, सेन्सॉर चिप आदि साहित्य असलेली किट तयार करुन दिली जाणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग- 5 कि.मी., 10 कि.मी., 21 कि.मी. होणाऱ्या स्पर्धेसाठी पालवण घाट, पिंपळवंडी, तुपेवस्ती, कदमवस्ती वरुन परत स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर 21 कि.मी. अंतर पुर्ण होईल या मार्गावरील गावातील लोक जे की, सकाळी दुध, भाजीपाला घेऊन बीडला येतात त्यांच्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था सकाळी 5.30 ते 10.00 या वेळेत पिंपळवंडी, भाळवणी, वरवटी ते पालवण चौक या मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.
4 एक्कर मध्ये पार्कींग
राज्यभरातुन येणाऱ्या धावपटूंची गैरसोय होऊ नये म्हणुन योगा प्रतिष्ठाणच्या वतीने पालवण गावाच्या पुढे 4 एक्कर मध्ये 4 चार चाकी, 2 चाकी गाड्यांसाठी पार्कंग व्यवस्था करण्यात आली असुन सर्वांनी या पार्कींग मध्ये आपले वाहन पाकींग करावे अशी विनंती योगा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment