मराठ्यांच्या विरोधात मराठा उभा करून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच युद्ध लाऊन दिलं- डॉ जितीन वंजारे
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे एका विशिष्ट संघटनाचे कार्यकर्ते आज सत्तेमध्ये आहेत ही खेदाची गोष्ट असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. आरएसएस या संघटनेमध्ये राजकीय बाळकडू पिलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पक्ष तोडले आणि स्वतःच्या भाजपा या पक्षांमध्ये सर्वांना एकत्र करून स्वतःच्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आणली, हा सगळा आटापिटा एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी केला परंतु या महाराष्ट्राला मी पुन्हा येईन.....,पुन्हा येईन.....,पुन्हा येईन..... असं ठामपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का झाले नाहीत हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे याचे उत्तर सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी सांगितले की भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये येण्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि नंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये सर्व समाजाला आरक्षण देन्याची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस आरक्षण देण्यास असमर्थ ठरले.कारण हा राजकीय जुमला होता हे त्यांना माहीत होत फक्त सत्ता आणणे हेच दिल्लिश्वराच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि आपली पत राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वाटेल ते आश्वासने दिली आता सत्ता येण्याचे आणि शिवसेनेनं दूर जाण्यामुळे गेलेली सत्ता हा घाव पचनी न पडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी एन केन सत्ता आणली पक्ष फोडून का होईना स्वतःची सत्ता असावी अशी दिल्लिश्वराची तंबी कायम सर आखोपर ठेऊन देवेंद्रजिनी काम चालू केलं खर पण इकडे मराठ्यांचे तापते डोके ,मराठा आरक्षणावर होणाऱ्या आत्महत्या, धनगर समाजाला आरक्षण,धनगर वोट,मराठा वोट चा दबाव ,त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा विरोधी जाणार वातावरण शिवसेनेची अकाली एक्झीट फडणवीस यांच्या चांगली लक्षात होती त्यामुळे सर्व सत्ता आपल्या हाती घेऊनही ह्या चतुर चाणाक्ष राजकारण्यान सत्ता मराठ्यांच्या हाती दिली आणि मराठ्यांच्या विरोधात मराठा उभा करून म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे बलशाली नेते अजित पवार उप मुख्यमंत्री करून स्वतः दुय्यम उपमुख्यमंत्री राहून कुऱ्हाडीचा दांडा होतास काळ केला आता यान झाला काय ? .....महाराष्ट्रात मराठ्यांचा उद्रेक झाला .आपलेच आपल्या कामाचे नाहीत अस मराठ्यांना भासवून दिलं,आणि महाराष्ट्रात स्थिर सत्ता पाहिजे असल्यास केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री असला पाहिजे ह्या अप्रत्यक्ष परिणामी निकष दिले.परिणामी मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माथी आरक्षण न मिळण्याचे खापर फोडून स्वतः फडणविस अलगद बाजूला झाले म्हणजेच मराठ्यांच्या विरोधात मराठा उभा करून फडणवीस यांनी पेशवाई गेम खेळला असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत परंतु आता मराठे दूधखुळे राहिलेले नाहीत, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय कोणत्याच राजकीय नेत्याला तरणोपाय नाही,आरक्षण हाच अंतिम पर्याय असून आता मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर कोणताच राजकीय नेता किंवा विशिष्ट राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कोणत्याच पक्षाचा विशिष्ट झेंडा घेऊन प्रचारार्थ फिरू शकत नाही कारण भूतो ना भविष्य मराठ्यांची एकता आणि सामाजिकता यावेळेस झालेली आहे सन्माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर गावोगावी खेडोपाणी फिरणाऱ्या नेत्यांना आणि नेत्यांच्या गाड्याना फोडण्यास सुरुवात झालेली आहे,नेत्यांना अडून,गाड्या फोडून, आत्महत्या, करून जरी आरक्षण भेटणार नसले तरी मराठा बांधवांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनाने ठोस पाऊल उचलून आरक्षण देण्यासंदर्भात शासकीय हालचाली वेळीच केल्या नाहीत तर मराठे तापल्याशिवाय राहणार नाहीत आणि मराठ्याचा पोरं..... तळपती तलवार..... एकदा का सुटल की कोणाची खैर नाही हे भविष्य असणार आहे.त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेऊन आरक्षण संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे.मोदी महाराष्ट्रात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून सत्तेत आले आणि त्यांच्या जातीला विसरून मराठ्यांच्या आरक्षणाचा भ्र शब्दही न काढता वळून पळून गेले हे अशोभनीय आहे.ओबीसी आरक्षनात मराठा सामाविष्ट करून जातीय जनगणना करून जिसकी जितनी भागीदारी उसकी उतणी हिस्सेदारी ह्या युक्तीप्रमाने आरक्षण दिले गेले पाहिजे.जनगणना होऊ द्यायची नाही आणि आरक्षण द्यायचं नाही त्या अरक्षणा च्या नावावर राजकारण करून सत्तेत यायचं हेच षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांच दिसत आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीचा अभ्यास केला असता आजतागायत मराठा मुख्यमंत्री खूपच कमी झालेले आहेत कारण तुलनेत ब्राह्मणांच्या किंवा उच्च वर्णीयांच्या जातीतील मुख्यमंत्र्यांची संख्या जास्त आहे त्या तुलनेत ओबीसींच्या मुख्यमंत्र्यांची संख्या खूपच कमी आहे,दलितांची तर विचारूच नका. यावेळेस महाराष्ट्रातील मराठ्यांचा मुख्यमंत्री सत्तेमध्ये असताना फडणवीसांनी मुद्दाम होऊन एकनाथ शिंदे यांना मराठा मुख्यमंत्री म्हणून पुढे केले आणि आरक्षणाचा तापता तवा त्यांच्या डोक्यावरती ठेवला त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून स्वतःवर तो तवा पोळेल याची पूर्णपणे माहिती असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मातब्बर नेते अजित पवार यांना सोबतीला घेतले ज्या शरद पवारांनी आयुष्यभर इतर पक्ष तोडून स्वतःचा पक्ष बळकट करू पाहिला, त्यांच्या पक्षाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणामध्ये हिंमत नसताना, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील राजकारणातील भीष्मपितामह असणाऱ्या शरद पवारांना स्वतःच्या पुतण्यांनी शह द्यावा आणि त्याला रसद फडणवीसांची असावी, एक दिवसाचा का असेना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना सुरुवातीला हुलकावणी द्यायला लावणे आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावरती स्वतः अध्यक्षपदाचा दावा करून राष्ट्रवादी पक्ष फोडण्यासाठीचे शर्तीचे आणि युक्तीचे प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस हे चतुर नेते असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानणे हे माझ्या बुद्धीला न पटणारे गणित आहे. स्वतः सर्व परिस्थिती अनुकूल असताना मुख्यमंत्री पदाचे सर्वस्वी प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री ते पण दुय्यम दर्जाचे होतात आणि मराठा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पुढे करून मराठ्यांच्या विरोधात मराठा वाद लाऊन मजा घेणं हा पेशवाई पासूनचा आलेला तोडो फोडो राज्य करो .....हा विचार अमलात आणला.फडणवीस खरोखर हुशार नेता आहे,कुशाग्र राजकारणी,भविष्यातील वेध असलेला पण सत्तेसाठी हपापलेले नेता आहे.कोणाची पिन कुठे टोचायची आणि कोणता बल्ब लावायचा कोणता फोडायचा हे पक्क माहीत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जरी मराठयांचा वाद लावला असला तरी मराठा नेते म्हणून दानवे,राणे,पवार,शिंदे, कदम,सदावर्ते, भुजबळ,पडळकर हे सगळेच फडणवीस यांच्या दावणीचे शिकस्त आहेत ते असे काही वादात्मक बोलतात की सगळं कुसळ केरात घालावं लागतं.मग विकासाची मुद्दे बाजूला सारून अनावश्यक मुद्दे समोर केले जातात.आणि सरकार जे अकार्यक्षम आहे ते टाईम पास सरकार म्हणून वेळ काढूपना करत आहे. पण मनोज जरांगे हा जातिवंत मराठा योद्धा जिद्दीला पेटला असून सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे अख्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे .फडणवीसांनी गृहखात स्वतःकडे ठेवलं आहे, लाठीचार्ज गृहमंत्री च्यां परवानगी शिवाय होऊच शकत नाही मग मराठ्यांना अमानुष मारहाण प्रकरणी राजीनामा न देणाऱ्या माराठाद्वेशी फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता.भीतीपोटी भाजपात गेलेल्या नेत्यांना परत घर का ना घाट का सोडून फडणवीस सगळ्यांची कायदेशीर वाट लावणार आहेत हेही तितकच खर आहे.त्यामुळे आरक्षणासाठी खरोखर लढणाऱ्या मराठा तरुणांनी आत्महत्या ,जाळपोळ,मारहाण न करता सनदशील लोकशाही संविधानिक मार्गाने चालणाऱ्या मनोज जरांगे सारख्या योध्याला समर्थन देऊन अताताई न करता सय्यमाने शांतीने,लोकशाही मार्गाने बंड पुकारले पाहिजेत.मंगेश साबळे यांच्या भावना समजू शकतो पण तो लोकशाहीचा मार्ग नसून महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या कायदेशीर मार्गाने आंदोलन करून आरक्षण मिळवलं पाहिजे .त्यामुळे कोणीही आत्महत्या ,जाळपोळ करू नका ,आपल्या समाजातील खरे आणि खोटे नेते समजून सामाजिक लढाई लढू आणि जिंकू फक्त आत्महत्या करू नका ,जाळपोळ करू नका शांततेत आंदोलन करा.आणि हो आरक्षण पाहिजे ना तर त्याची संकल्पना देणारे छत्रपति शाहू महाराज ,ज्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे त्याचे आद्य गुरू महात्मा ज्योतिबा फुले,आणि ज्यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली त्या महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही आंदोलनात डोक्यावर घेऊन जात जावा त्याची उपासना त्यांची पुस्तके वाचून काढा त्यांचे विचार आत्मसात करा. असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे....
लेखन - डॉ जितीन वंजारे -९९२२५४१०३०
Comments
Post a Comment