शाळेच्या परिसरात वाढलेले गवत काढण्यासाठी शिक्षिकेने घेतला हातात तणनाशक पंप सर्वत्र होतंय कौतूक


 आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) : 
  जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ , खर्डा येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते , त्याचा मुलांना खेळण्यासाठी अडथळा येत होता .
    गेली आठ दिवसा पासून गवत काढण्यासाठी शोधूनही कोणीही मजूर मिळत नव्हता . शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कामिनी राजगुरु मॅडम यांनी स्वतः ग्रामपंचायत कार्यालय खर्डा कडून तणनाशक फवारणी पंप मिळवून स्वतः वाढलेल्या गवतावर फवारणी केली. मुलांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरांतून त्यांचे कौतूक होत आहे .                  
   शुक्रवार पेठ शाळेतील विद्यार्थी यांची शैक्षणिक गुणवत्ताही चांगली असून येथे काम करणाऱ्या दोनही शिक्षिकांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल जाधव, केंद्रप्रमुख राम निकम व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी