वैद्यनाथ महाविद्यालय समोर गती रोधक बसवा; सोमवारी रास्ता रोको आंदोलन .
शेकडो च्या संख्येने सहभागी व्हावे- ज्ञानेश्वर मुंडे
प्रतिनिधी (परळी)
परळी शहरातील आझाद चौक, सिंचन भवन, वैद्यनाथ महाविद्यालय समोर गती रोधक बसवा या मागणी साठी सोमवार दि 30 ऑक्टबर 2023 रोजी भाजप विद्यार्थी आघाडी चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शेकडो संख्येने सहभागी व्हा असे आव्हान केले आहे .
परळी वै अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 B परळी शहरातून जात असुन सदर रस्त्या लगत तहसील, सिंचन भवन, आयटीआय कॉलेज,कोर्ट सह वैद्यनाथ महाविद्यालय आहे .
सदरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची रहदारी आहे. या महामार्ग लागत शहरातील नामवंत वैद्यनाथ महाविद्यालय आहे या महामार्गावरून अनेक विद्यार्थी कॉलेजला जा ये करत असतात. या मार्गावर कॉलेज समोर गती रोधक नसल्या मुळे वाहनाचा वेग वाढून गेल्या काही दिवसात अपघात पण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी वैद्यनाथ महाविद्यालय चे शिपाई यांचा पन कॉलेज समोर अपघाती मृत्यू झाला असुन काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच या ठिकाणावरून अनेक विद्यार्थिनी पायी ये जा करत असतात गती रोधक नसल्याने रोड रोमियो देखील आपल्या वाहनाचा वेग कॉलेज समोर वाढवून वेगाने कट मारत आहेत.या मुळे अनेक मुलींना या त्रासाला सामोर जावं लागत आहे.या तरी वरील आझाद चौक,सिंचन भवन,वैधनाथ महाविद्यालय समोर गती रोधक बसवण्यात यावे अशी मागणी 10 ऑक्टो रोजी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करून आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता पण प्रशासनाने कुठलीही दखल घेतली गेली नाही म्हणून सोमवार रोजी सकाळी 10 वाजता वैद्यनाथ महाविद्यालय सामोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शेकडो संख्येने सहभागी व्हा असे आव्हान भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment