मादळमोही येथे मोहिमाता देवी यात्रा उत्सव कोजागरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869
गेवराई तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहिमाता देवी, मादळमोही येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान यावेळी पंचक्रोशीतील महिलांसह पुरुष भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मोहीमातेच्या मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे. यामुळे भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटले आहे.
मादळमोही येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोहीमाता यात्रा उत्सवात शनिवारी सकाळी गंगेचे पाणी कावडीने आणून गावातील विविध मार्गावरून लेझीम, ढोल-ताशा, टाळमृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून अभिषेक करण्यात आला. तसेच भाविकांचा नवसाच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान रात्री गावातून मोहिमाता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून, आकाशात आकाश कंदिल देखील सोडण्यात आले. या यात्रेत बच्चे कंपनीचा लाड पुरवण्यासाठी राहट पाळणे, खेळण्याची व खाऊ वाल्यांच्या दुकानांसह विविध दुकाने थाटली होती. तर रविवारी रोजी नामांकित मल्लांच्या उपस्थितीत जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणर आहे. तर मोहीमाता देवीच्या दर्शनासाठी शनिवारी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
Comments
Post a Comment