बहुजन विकास परिषेद च्या विविध पदांच्या निवडी जाहीर


बीड प्रतिनिधी
केज येथील मुक्ता मंगल कार्यालय मध्ये काल दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी बहुजन विकास परिषद च्या संकल्प मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे , प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष रमेश पाटोळे,मान्यवरांच्या हस्ते बहुजन विकास परिषेद उद्योग विकास आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष भागवत वैद्य सह। बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश रोकडे युवक उप जिल्हाध्यक्ष अनिल कटक बीड जिल्हा सचिव ऋषिकेश धुताडमल बीड जिल्हा संपर्कप्रमुख मसू भाऊ पवार बीड जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर कानडे सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
भागवत वैद्य यांनी महिला बचत गटाचे मार्फत अनेक उद्योग निर्माण केले असून बीड मध्ये पहिली महिला उद्योग परिषदचे आयोजन केले होते.आता बहुजन विकास परिषद च्या माध्यमातून रमेश तात्या गालफाडे यांच्या मार्गदर्शनाने महिलांना उद्योग ,व्यवसाय करण्यासाठी महिलांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देऊन उद्योग चालू करून द्याण्यासाठी त्यांना कच्चा माल पुरवठा करून त्यांनी बनविलेला मालाची मार्केटिंग देखील करण्यात येणार आहे.त्यासाठी बीड जिल्ह्यात बहुजन विकास परिषद अंतर्गत उद्योग विकास आघाडी चे पदाधिकारी निवड करून लवकर उद्योग व्यवसाय चालू करून महिलांना रोजगार व्यवस्था करण्यात येणार आहे. बहुजन विकास परिषेद उद्योग विकास आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल। बहुजन विकास परिषदेच्या उद्योग विकास आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी भागवत वैद्य यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देताना निजाम शेख, अशोक कोकणे, सुनीता सोनवणे,मंगल तोडकर,नंदा भंडारे, मोमीन भाबी,उषा वडमारे आदी दिसत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी