गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण

बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील ग्रामस्थ व महिला भगिनींनी आज सकाळी 9--00 वाजता गढी येथील माजलगाव फाटा येथील चौकात मनोज जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण व अन्नत्याग आसे उपोषण सुरू केले आहे जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गढी येथील ग्रामस्थ व महिला भगिनींनी हे साखळी उपोषण सुरू राहील असे गढी येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित युवक बाळासाहेब मुळीक.राहुल लोणकर . गणेश गायकवाड.मोहन घोंगडे.पदमाकर सिरसाट व महिला भगिनींनी नर्मदा सिरसट.मदा गायकवाड.ईत्यादी महिला व तरूण युवक या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत या वेळी महिला भगिनींनीशी चर्चा करताना त्या अश्या म्हणाल्या की आमच्या मुलांना व मुलींच्या शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ होईल तेव्हा या सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे या साखळी उपोषणात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींनी बोलताना दिसत होत्या