मलकापूर शहरात दोन लक्झरींची जोरदार टक्कर: 7 प्रवासी ठार
बुलढाणा, 29 जुलै : मलकापूर शहरात नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण सात प्रवासी ठार झाले असून 25 ते 30 प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज पहाटे 02:45 वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच 08-9458) रॉयल कंपनीची असून दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच 27 बिएक्स 4466) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळत आहेत. अपघातानंतर दोन्ही गोष्टी समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाले आहेत. तीर्थयात्रींच्या बसमधील ड्रायव्हर सुद्धा या अपघातात ठार झाला आहे. घटनास्थळी एकूण 5 प्रवासी गतप्राण झालेत तर 2 प्रवासी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी आणल्यानंतर दगावले.
Comments
Post a Comment