जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सय्यदमीर बाबा विद्यालयामध्ये वृक्षारोपण
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
मौजे आष्टी तालुक्यातील लोणी येथे आज गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाळके आबा व मा. ग्रा. सदस्य सुभाष दादा भोसले यांनी सय्यदमीर बाबा विद्यालयांमध्ये वृक्षारोपण केले. नवीन पिढीसाठी खूप छान असा संदेश या ठिकाणी दिला असुन 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हे आपण ऐकलेले आहेच. परंतु, वृक्षांचे पालनपोषण, संगोपन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे हे आपण विसरता कामा नये. वृक्षारोपणाने हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला गेला...
या प़सगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर ,तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment