शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले --- बाळासाहेब धनवे
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
माहिती संकलनात जिल्ह्यात शेवटी असणारा जामखेड तालुका आज प्रथम क्रमांकावर
एके काळी शिक्षणात सर्वात मागे असणारा तालुका आज अग्रेसर आहे. तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक कार्यक्षम आहेत. त्यांच्या अनेक सकारात्मक बाबी आहेत त्यांना प्रोत्साहन दिले यामुळे जीव ओतून शिक्षकांनी काम केले त्यामुळे माहिती संकलनात शेवटी असणारा जामखेड तालुका आज प्रथम क्रमांकावर आला आहे. असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सांगितले.
शुक्रवार दि. २८ रोजी ल. ना. होशिंग विद्यालयातील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली जामखेड, पाटोदा, राजुरी व साकत केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गणपत चव्हाण, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, संजय घोडके, सुरेश मोहिते, ज्ञानेश्वर कोळेकर, विजय जेधे, राम ढवळे, विजयकुमार जाधव, भगवान समुद्र, संदिप ओझा, किशोर राठोड यांच्या सह जामखेड, पाटोदा, राजुरी व साकत केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका हजर होत्या.
विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो असे सांगितले. शिक्षकांनी जीव ओतून काम केल्यावर विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकतात याचे मानसिक समाधान खूप मोठे असते.
Comments
Post a Comment