सामाजिक उन्नतीसाठी तसेच जनतेचा आवाज सभागृहात मांडण्यासाठी मा.राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदार पदी नियुक्ती करा-किसान पुत्र श्रीकांत गदळे
.
बीड: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकरी शेतमजुर. कष्टकरी. कामगार. उपेक्षित घटक. विधवा परित्यक्ता महिलां वरील होणारा अन्याय अत्याचार. शिक्षण. आरोग्य. निसर्ग समतोल इ. विविध विषयावर प्राण पणाला लावुन काम करत आहे. मात्र काम करत आसताना माझ्याकडे कसल्याही प्रकारचे पद नसल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तरी मा. राज्यपाल साहेबांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मला विधान परिषदेवर आमदारकी द्यावी.मा.राज्यपाल महोदयांनी आपल्या कोट्यातील 12 जागेपैकी एका जागेवर मला आमदारकी या पदावर माझी नियुक्ती केल्यास समाज हिताचे काम करण्याचे माझे स्वप्न साकार होईल. तरी मा.राज्यपाल महोदयांनी राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेसाठी आमदार म्हणून माझी नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधना मधून केवळ1रू.(एक रुपया) प्रतिमाह मानधन स्वतःसाठी महाराष्ट्र शासनाचा सन्मान म्हणून घेईन आणि उर्वरित मानधन रक्कम गोरगरीब शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी यांच्या कल्याणासाठी शासनाच्या तिजोरीत जमा करावेत. असे शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वर सदरील प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राजी खुशीने लिहून दिले आहे. तरी महोदयांनी शेतकरी तरुणांची व्यसनाधीनता. युवकांची क्रायशक्ती वाढवणे. महिलांचे प्रश्न. कामगारांचे प्रश्नन इ. प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये पाठवून संधी द्यावी ही नम्र विनंती. आपण जर माझी मागणी.आज पासून सात दिवसाच्या आत मान्य न झाल्यास संबंधित मा.जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल. याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी मा. राज्यपाल महोदय रमेश बैस यांच्याकडे निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत केली आहे.असे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे....
Comments
Post a Comment