पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती :दक्षिण आणि उत्तर नगरच्या नेमणुका जाहीर

 

मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या दक्षिण नगर जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार
महेश देशपांडे (पुण्यनगरी) यांची तर समन्वयकपदी दीव्य मराठीचे बंडू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे..उत्तर नगर जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून गुरूप्रसाद देशपांडे (नेवासा) यांची तर समन्वयक म्हणून राजेंद्र उंडे(राहुरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज या दोन्ही घोषणा केल्या.. ..

राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत.त्यानुसार दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.. दोन्ही जिल्ह्यात पक्त्रकार हल्ला विरोधी कृती समित्या सक्षम करण्याची जबाबदारी नवीन पदाधिकारयांवर सोपविण्यात आली आहे.. नवीन नेमणुका पुढील दोन वर्षांसाठी असतील.. हे पदाधिकारी मराठी पत्रकार परिषदेला पूरक असे काम करतील.. 

पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणारया धमक्या बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते.. सर्व जिल्ह्यातील नियुक्तया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदयाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी लवकरच एक मेळावा घेण्यात येणार आहे.. यावेळी सर्व जिल्हा निमंत्रक आणि समन्वयकांना सन्मानित केले जाईल.. असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे..

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी