तुकाराम महाराज गाथा पारायण केले त्यांना पुण्य प्राप्त होते - ह.भ.प.महंत जनार्दन महाराज
तळणेवाडी येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे
अधिक मासात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा पारायण केले. त्यांना प्रत्यक्ष वेदाचे पठण केल्याचे पुण्य फळ मिळते. असे प्रतिपादन श्री क्षेत्र गडाचे महंत स्वामी जर्नादन महाराज यांनी तळणेवाडी येथे आयोजित तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे संत ह.भ.प.वै.गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मासानिमित्त पुर्व पुण्य काळाचे महत्व जाणून संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासुन विठ्ठल रुक्मिणी मंदीरात तुकाराम महाराज गाथा पारायण मोठ्याउ उत्साहात संपन्न झाले. जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥ तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्.॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३ ॥ या अभंगावर चिंतन करुन महंत जनार्दन महाराज यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दरम्यान यावेळी पत्रकार तुकाराम धस यांना महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना महंत जर्नादन महाराज म्हणाले की ज्या भविकांनी या पावन पुण्य भुमित पारायण करून अपले जीवन धन्य करुन त्यांनी प्रत्यक्षात वेदाचे पारायण केले असून त्यांचे पुण्य फळ त्यांना मिळणार आहे. स्वामी महंत निगमानंद महाराजांचा कृपाप्रसाद मिळालेले तळणेवाडी गाव आहे. गरज पडली तर उत्साहाने पुढे होवून मदत करनारे गाव असून पूजनीय गुरु देवांचे अशिर्वाद आहे म्हणून मी आज तुमच्या पुढे ऊभा आहे. संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यात ज्यांनी सहभागी होवून पारायण केले ज्यांनी सेवा केली ज्यांनी अन्नदान केले. इतर कामे केलेत त्यांना सुद्धा यांचे फळ मिळते.तर यावेळी पारायण करणाऱ्या मंडळीस एक सन्मानपत्र देऊन कुंडलिक ठोंबरे यांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. तर विनोद सरगर यांच्या कडून बाबास कपडे व जेवन देण्यात आले. शहादेव संतराम शिंदे यांनी विशेष देणगी देवून सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment