रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणाच सलाईनवर, आरोग्य सेवांवर परीणाम, कर्मचाऱ्यांवर ताण :- डॉ.गणेश ढवळे
---
बीड जिल्ह्यातील जिल्हा परीषद अंतर्गत आरोग्य विभागातील ८५३ मंजुर पदापैकी ४७५ पदे म्हणजेच ६० टक्के पदे रिक्त असुन आरोग्य यंत्रणा सलाईनवर असुन तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या मार्फत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना केली आहे.
बीड जिल्ह्यातील जिल्हा परीषद अंतर्गत आरोग्य विभागातील एकुण मंजूर ८५३ पदापैकी केवळ ४७५ पदे ( आरोग्य पर्यवेक्षक ५ पैकी ३ , औषध निर्माण अधिकारी ६८ पैकी १६ , युनानी मिश्रक ५ पैकी ५ , आरोग्य सेवक महिला ४९५ पैकी ३१८ , आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के) १२३ पैकी २३ , आरोग्य सेवक पुरुष ( ५० टक्के) १५४ पैकी १०९ , कुष्ठरोग तंत्रज्ञ ३ पैकी १ म्हणजेच एकुण ६० टक्के पदे रिक्त असुन रिक्त पदांमुळे सेवा विस्कळित झाली असुन अन्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असुन पावसाळ्यात सध्या साथीचे आजार पसरत असुन आरोग्य सेवेवर मोठा परीणाम होत असुन रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे पर्यायाने संपूर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असुन रूग्णांची हेळसांड थांबण्यासाठी तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत .
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ पदे रिक्त
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी १ , सीएचओ २ , एमपीडब्लू २, एएनएम २, वाहनचालक १ अशी एकुण ८ पदे रिक्त आहेत .लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आसपासच्या १३ गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरवली जाते.मात्र रिक्त पदांमुळे आरोग्य सूविधा देण्यास अडचणी येत असुन आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असुन त्यांचेच आरोग्य बिघडण्याचा धोका आहे.त्यामुळे तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment