राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल निंदाजनक वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी भिडेच्या पुतळ्याचे दहन
----
लिंबागणेश:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या मुस्लिम द्वेष्ट्या संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२९ जुलै शनिवार रोजी दि.२९.०७.२०२३ सकाळी १०वा.अहमदपुर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गा वरील लिंबागणेश बसस्थानक येथे राष्ट्रद्रोही संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोडे मारत पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्फत ईमेल द्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात,ग्रां.स.दामुकाका थोरात, आंबेडकरवादी नेते रविबापु निर्मळ, सुरेश निर्मळ, लेहनाजी गायकवाड, पांडुरंग वाणी,विनायक मोरे, सर्पमित्र अशोक जाधव, विक्रांत वाणी, अभिजित गायकवाड, रामचंद्र मोरे,अजय थोरात, तुकाराम गायकवाड,कृष्णा वायभट आदि सहभागी होते.
सविस्तर माहितीस्तव
-----
अमरावती येथील कार्यक्रमात संभाजी भिडे नामक व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसुन एक मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते,त्याच जमीनदाराची मोठी रक्कम रक्कम चोरून ते पळुन गेले होते.त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला.त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसुन ते त्याच मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत.मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लिम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशा प्रकारे अवमानकारक राष्ट्रपिता यांचे चारित्र्य हनन करणा-या राष्ट्रद्रोही मनोविकृत मुस्लिम द्वेष्ट्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी.या प्रमुख मागणीसह निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
Comments
Post a Comment