साक्री तालुकास्तरीय सार्वजनिक ग्रंथालयांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न



कर्मचारी व पदाधिकारी अपडेट राहणे गरजेचे- अनिल सोनवणे (प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ)

धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे व धुळे जिल्हा ग्रंथालय संघ संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश भदाणे ,कार्यवाह रोहिदास हाके, राहुल महिरे, उपाध्यक्ष महेंद्र जाधव,नाशिक विभाग संचालक राहुलकुमार महिरे,संचालक नरेंद्र देवरे,प्रमोद महाजन, तज्ञ मार्गदर्शक प्रमोद वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व ग्रंथालय शास्त्राचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाच्या कामकाजात सुसूत्रता यावी म्हणुन ऑनलाईन वार्षिक अहवाल भरण्यात यावा. यासंदर्भात तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे कर्मचारी व पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. नुकतेच महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाचे ६०% अनुदान वाढ केली म्हणुन शासनाचे अभिनंदन करण्यात आले. सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी व पदाधिकारी यांनी अपडेट राहण्याची गरज आहे असे मनोगत अनिल सोनवणे यांनी मांडले. जिल्हाध्यक्ष अविनाश भदाणे, अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमोद वाणी यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी साक्री तालुका कार्यकारणी निवड करण्यात येऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली कार्यकारणी पुढील प्रमाणे साक्री तालुकाध्यक्ष जयश्री गावीत पिंजारझाडी, उपाध्यक्ष नानाभाऊ पाटील छावडी, कार्याध्यक्ष मिलींद महाजन मैंदाणे, कार्यवाह उज्ज्वल अग्निहोत्री साक्री,सहकार्यवाह भूषण कोठावदे पिंपळनेर,तर संचालक पदी मोहन सोनवणे भामेर, बन्सीलाल महाले जामखेल, कमलेश चव्हाण दातर्ती, अनिल शिंदे पिंपळगाव, जितेंद्र देवरे म्हसदी,यांची सर्वानुमते पदाधिकारी व संचालक पदी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन राहुलकुमार महिरे यांनी तर आभार नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष ताईसो जयश्री गावीत केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी