आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे सह गायरान धारकांनी आभार मानून सत्कार केला
आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे सह गायरान धारकांनी आभार मानून सत्कार केला
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : महाराष्ट्रातील शासकीय गायरान जमिनीवरील / शेतीवरील अतिक्रमणे / आणि गायराना वरील बांधकामे या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चालू होता . यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोशल फोरम संघटनेमार्फत अनेक आंदोलने केली , निवेदने देऊन पाठपुरावा आज पर्यंत चालूच होता .
आदिवासी ,दिन, दलित, विमुक्त, भटके, समाजातील भूमिहीन शेतमजूर घटकांची उपजीविकेचे साधन अतिक्रमित केलेले गायरान जमीन नियमानुकुल करण्यात यावे यासाठी समाजात समरसता निर्माण होणार नाही , त्यामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्यात यावे , आणि शेतमजुरांच्या नावे सातबारा मिळेपर्यंत आपण या अतिक्रमणधारकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून यशवंत खंडागळे साहेब यांनी धीर दिला असून राज्यात ४ लाख २३ हजारापेक्षा अधिक गायरान धारक असून या गायरान धारकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांना वारंवार सोशल फोरम संघटनेच्या माध्यमातून निवेदने देण्यात आली होती .
याची दखल आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांनी घेऊन नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गायरान धारकांच्या जमिनीचा मुद्दा सविस्तर मांडून गायरान धारकांना न्याय देण्याची विनंती केली , विनंती केल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे साहेब सह सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी गायरान धारक, शेतकरी, शेतमजूर, दिन, दलीत, भटके, विमुक्त, आदी बांधवांनी आज रविवार दिनांक ३० जुलै रोजी सकाळी आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वांनी मनापासून आमदार सुरेश ( आण्णा ) धस यांचे आभार मानले . त्यांचा याप्रसंगी सत्कार समारंभ करण्यात आला .
Comments
Post a Comment