मनिपुर हत्याकांड प्रकरणी पाटोदा येथे सर्व पक्षीय दणका मोर्चाचे आयोजन-प्रतिक जावळे


पाटोदा (प्रतिनिधी) मनिपुर येथे ३मे पासुन होणा-या दलित आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी पाटोदा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दणका मोर्चा चे दि.३ऑगस्ट२०२३ रोजी सकाळी ठिक ११वा सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज चौक ते राजमोहम्मद चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधुन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चामध्ये आष्टी पाटोदा व शिरुर तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती चे सर्व नागरिक सहभागी होणार आहेत.
या मोर्चामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आदिवासी समाज संघटना,भटक्या विमुक्त जमाती संघटना,एकलव्य संघटना,बिर्सा मुंडा संघटना,जय लहुजी संघटना,डेमो क्रोटिक पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व इत्यादी सहभागी होणार आहेत.तरी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रतिक जावळे यांच्याकडून आव्हान करण्यात येत आहे की मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून मणिपूर येथील सर्व मॄत बंधु भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित राहावे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी