परळी नगरपालिकेने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा. बालासाहेब जगतकर
परळी प्रतिनिधी-परळी नगरपालिकेने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त परळी शहरातील बस स्थानकासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी नगरपालिकेने पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बाळासाहेब जगतकर यांनी केली असून याचे लेखी निवेदन राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment