संभाजी भिडेवर कारवाई करावी म्हणून पाटोदा वंचित बहुजन आघाडी आक्रमक
पाटोदा (गणेश शेवाळे) संभाजी भिडे हे वारंवार वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भिडे यांने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त विधान करत अतंत्य निंदनीय व खालच्या दर्जाचे विधान करून राष्ट्रपिताचा अवमान करत देशवासीयांच्या भावना दुखावल्या आसुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सारख्या महापुरुषांवर आवमान कारव वादग्रस्त विधान भिडेनी केलेले आहे यामुळे सरकारने जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करणाऱ्या वाचाळवीर मनोहर (संभाजी) भिडेवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात मरे पर्यंत रवानगी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पाटोदा वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार चितळे यांच्या कडे केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंड, सचिन मेघडबर,श्यामसुंदर वाघमारे,राहुल शिरोळे, सुभाष सोनवणे, पत्रकार हारिदास शेलार,परसराम गायकवाड, सुनील गायकवाड, गोकुळ पुलवळे, गोविंद यादव, संदीप मस्के,
आदिंच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment