कै.गुळवे नंतर जिल्हयाचे पक्षीय नेतृत्वाची संधी बोडकेनां (व्यक्तिविशेष लेख
कै.गुळवे नंतर जिल्हयाचे पक्षीय नेतृत्वाची संधी बोडकेनां (व्यक्तिविशेष लेख)
नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नाशिक महानगर नियोजन समितीचे सदस्य, नियोजन समिती नाशिक जिल्हा सदस्य , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती.ईगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे प्रमुख अशी अल्पवयातच विविध पदे भुषवणार्या व नुसते पदेच भुषवणे नाही तर त्या माध्यमातुन थेट तळागाळाचा विकास करणारे गोरख भाऊ बोडके यांची नुकतीच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस चे सर्वेसर्वा अजित दादा पवार यांनी नुकतीच बोडके यांचे नियुक्तीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांचे आदेशाचे नियुक्तीपत्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांचे उपस्थितीत नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यालयात प्रदान करणेत आले आहे.
यापुर्वी एखादया पक्षाचे जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी कै.गोपाळराव गुळवे या ईगतपुरी तालुक्यातील भुमिपुत्रांस मिळाली होती.त्यानंतर गोरख बोडके यांच्या रुपाने प्रथमच ईगतपुरी तालुक्याला एवढा मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.
त्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला अल्पसा आढावा...
------------
ईगतपुरी तालुक्यातील मोडाळे हे आदिवासी बहुल व अतिदुर्गम गाव. विकासापासुन शेकडो कोस दुर हे गाव होते.या गावात अत्यंत गरिब कुटुंबात गोरख बोडके चां जन्म झाला.
शिक्षणाच्या निमित्ताने व पुढे रोजगारासाठी गोरख बोडके यांनी आपले गाव सोडले आणि ते वाडिवर्हे सारख्या निमशहरी गावात येऊन राहिले.
एकेकाळी स्वाध्यायी विचाराने भारलेल्या गोरख बोडके यांच्या भावी जीवनाची जडणघडणच वाडिवर्हे गावातुन झाली.
महत्त्वाकांक्षी व जिद्दी स्वभावाच्या बोडके प्रारंभी अनेक हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या.ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीने कामावरुन कमी केले.बेरोजगार होण्याची वेळ आली.
पण न डगमगता गोरख बोडकेनीं कामगार हितासाठी नांदगावचे विदयमान आमदार तथा तत्कालीन काळात एक प्रभावी कामगार नेते असलेल्या सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार संघटनेचे काम सुरु केले.
मुळात पायाला भिंगरी, उत्साही व्यक्तिमत्व व मदतीला तत्परतेने धावुन जाण्याचा स्वभाव यामुळे बोडके हे कामगारांमध्ये भलतेच प्रसिद्द झाले.
बोडकेच्यां राजकिय कारकिर्दीची सुरवात सुहास कांदे सोबतच मनसे तुन झाली. पुढे कांदे च्या सोबतीनेच ते राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये गेले.
सन २०१२-१३ ची जि.प.निवडणुक बोडकेच्यां एकुण कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली.
ईगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस काही ठिकाणापुरतीच सीमीत होती.पण बोडकेनीं शिरसाटे (धारगाव) जि.प.गटातुन उमेदवारी करत आश्चर्यकारक पद्धतीने विजय मिळवला.आणि या विजयानंतर बोडकेनीं मागे वळुनच पाहिले नाही.
जि.प.सदस्य पदाच्या काळात आमदार करणार नाही एवढे डोंगराएवढे काम बोडकेनीं केले. पक्ष बांधणीही मजबुत करतानांच नुसता ईगतपुरी च नव्हे त्रंबकेश्वर तालुका व नाशिक शहरातही बोडकेनीं पक्ष बांधणी मजबुत केली.कार्यकर्त्याचें जाळे त्यांनी विणले.निम्म्या रात्री हाक मारली तरी संकटात धावुन येईल अशी प्रतिमा बोडकेनीं तयार केली.त्या मुळे अल्पावधीतच एक लोकप्रिय नेता म्हणुन उदयास आले.
सन २०१७ च्या जि.प.निवडणुकीत तर बोडकेनीं अक्षरशः कमालच करत संपुर्ण जिल्हयाचे लक्ष वेधुन घेतले.
शिरसाटे जि.प.गट राखीव झाल्याने बोडकेनीं चक्क सुरगाणा तालुक्यातील जि.प.गटातुन पत्नीला उभे केले. समोर राजघराण्यातील सोनाली राजे पवार हया स्थानिक उमेदवार होत्या.असे असतानांही ज्या पवाराविरोधात कुणी उभे ठाकर नव्हते त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा व निवडुन येण्याचाही भीम पराक्रम बोडकेनीं केला.
हा विजय प्रचंड खळबळजनक, लक्षवेधी व बहुचर्चित ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचे ते आज अत्यंत जवळचे सहकारी असुन भुजबळाच्यां साथीने ते राजकारणातील वाटचाल करत आहे. पण हे करतानांच त्यांनी अन्य पक्षातही आपले मित्र जोडलेले आहेत.
बोडके केवळ राजकारणात किंगच नव्हे तर किंगमेकर ही ठरले आहेत.नुकत्याच आटोपलेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांनी ऐनवेळी बाजी पलटवत विजयश्री खेचुन आणली.
इतर नेत्यांप्रमाणे बोडके हे केवळ राजकारणीच नाही तर ते जास्तीत जास्त समाजकारणच करणारे नेते आहेत.
ज्या गावाने जन्म दिला त्या गावाचे पांग फेडण्यासाठी गोरख बोडकेनीं अक्षरशः रात्रीचा दिवस करत स्वप्नातील आदर्श गाव उभा केला.ज्या गावाच्या विकासाची चर्चा थेट राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मा.नरेंद मोदी यांनी केली.आज सर्व सुविधानीं युक्त मोडाळे गाव बोडके यांच्या अथक परिश्रमाने भारतातील एक रोल माडेल असे आदर्श गाव बनले आहे.
गोरख बोडके नावाच्या या उमदया युवा नेत्याने अवघ्या दहा वर्षात राजकारणाच्या माध्यमातुन चौफेर विकास केला आहे.राजकारण घाणेरडे मानले जाते पण बोडके सारखी तळमळीने काम करणारी माणसं पाहिली कि नक्कीच अभिमान वाटतो.ठरवलं तर राजकारणाच्या माध्यमातुन ही क्रांतीकारी बदल होऊ शकतात याची प्रकर्षाने जाणीव होते.
राजकारणात दुर्देवाने आजही जाती पातीला नको तितके महत्व दिले जाते.जातीचा मोठा समुह तुमच्या पाठिशी नसेल तर अशा कर्तृत्ववान व्यक्तीला ही दुर्देवाने मागे पाडले जाते ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. हया मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.
गोरख बोडके म्हंणजे एक अजब रसायन आहे.आणि अशा कर्तबगार युवकाला बळ देण्याची गरज आहे.
या कर्तबगार मित्राला नव्या जबाबदारीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
लेखन
नवनाथ अर्जुन पा गायकर
Comments
Post a Comment