गेवराई येथे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती मशाल मार्च निघणार
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर सत्यशोधक.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती मशाल मार्च दिनांक १/८/२०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता सविधान अधिकार मोर्चा समन्वय समितीच्या वतीने गेवराई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकापर्यंत क्रांती मशाल मार्च काढून सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येणार आहे अशी माहिती समन्वय समितीच्या वतीने प्रकाश भोले व शिवाजी डोंगरे यांनी दिली बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी संविधान अधिकार मोर्चा सन्माननीय समितीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये संविधान अधिकार मोर्चाच्या कामाचा आढावा घेऊन सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकापर्यंत क्रांती मशाल मार्च काढून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाविषयी सहमती दर्शवली असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले दिनांक एक ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता गेवराई शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून क्रांती मशाल मार्च निघणार आहे या बैठकीस संविधान अधिकार मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी प्रकाश भोले सुभाष सुतार ऑ निकम कडुदास कांबळे बाबासाहेब घौक्षे भगवान कांडेकर पप्पू गायकवाड महेश सौंदरमल शिवाजी डोंगरे रमेश कांडेकर धम्मपाल कांडेकर संजय सुतार अर्जुन सुतार रवींद्र पाटोळे गौतम कांडेकर विकास गायकवाड शेख बशीर इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या क्रांती मशाल मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी गेवराई शहरातील सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवार दिनांक एक ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संविधान अधिकार मोर्चाचे समन्वयक समितीचे वतीने प्रकाश भोले व शिवाजी डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले आहे
Comments
Post a Comment