पाटोदयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उभा करणार्या वाहनावर कारवाई करा - नितीन जाधव
पाटोदा(गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेशिस्त वाहनधारक कोणतेही नेयम न पाळता कशाही प्रकारे दोन चाकी चार चाकी वाहने रस्त्यावर उभा करीत असतात यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक अपघात होत असतात छत्रपती शिवाजी महाराज चौकात
मोठ्या संख्येने दोन चाकी चार चाकी वाहने उभा असल्यामुळे मोठाल्या गाड्या जाण्यास अडथळा निर्माण होतो यामुळे अनेक वेळा पाटोदेकराना ट्राफिकच्या समस्येचा सामना करावा लागला आसुन यावर प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे बेशिस्त वाहनधारकांना कुणाचा धाक राहिला नसून पाटोदयातील छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील रस्त्यावर उभा करणाऱ्या वाहनावर प्रशासनाने कारवाई करावी नसता पाटोदा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा नितीन जाधव यांनी दिला आहे
Comments
Post a Comment