धुळे जिल्हा ग्रंथालयातील ई प्रणाली कार्यशाळा संपन्न

 धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सयुक्त विद्यमाने ग्रंथालय अनुदान ई प्रणाली कार्यशाळा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय च्या हॉल मध्ये संपन्न. प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सयुक्त विद्यमाने केले होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . दत्ता परदेशी .कार्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ .ई प्रणालीचे उदघाटन श्री जगदिश पाटील . जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले . प्रमुख पाहूणे श्री चद्रशेखर ठाकूर . श्री अविनाश भदाणे. अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ श्री रोहिदास हाके प्रमुख कार्यवाह श्री प्रमोद वाणी .श्री एच ए. पाटील .पी एम सुर्यवंशी. हि .रा. चौधरी . हरीष पाटील . ज्ञानेश्वर माळी आदि . उपस्थित होते . यावेळी जगदिश पाटील यांनी सांगितले की . शिरपूर . शिंदखेडा . साक्री येथे ग्रंथालय पदाधिकारी ग्रंथपाल यांना ई प्रणालीची कार्यशाळा घेईन माहिती दिली आहे . त्याप्रमाणे धुळे ग्रामीण व धुळे शहर साठी ही माहिती देणार आहोत . अध्यक्षीय भाषणात डॉ . दत्ता परदेशी आपल्या भाषणात सागितले की ग्रंथालयाची अचूक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांनी संगणक व इंटरनेट साक्षर होऊन अधिक गतिमान होणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन डॉ . परदेशी यांनी केले . यावेळी श्री चंद्रशेखर ठाकुर यानीही मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाला शहर व धुळे तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी कर्मचारी मोठया संख्येने हजर होते . कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री हिम्मतराव पाटील यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह रोहिदास हाके यांनी मानले .मा. संपादक साहेब. सदर बातमी प्रसिद्धीस द्यावे हि .विनंती रोहिदास हाके

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी