अंबाजोगाई शहरातील शेकडो तरूणांचा मनसेत प्रवेश
बीड जिल्हा ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
महाराषट्रातील चाललेल्या गच्छाळ राजकारणाला कंटाळलेल्या व राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन अंबाजोगाई शहरातील शेकडो तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला . राज्याच्या राजकारणाचा झालेला विचका पाहुन महाराष्ट्राला एकमेव आशेचा किरण म्हणुन राज ठाकरे यांच्याकडे तरुण वर्ग पहात आहे. शिवाय आतापर्यंत सर्व पक्षांना सत्ता दिली पण गोरगरिबांच्या वस्त्या विकासापासुन लांबच राहील्या. या वस्त्यांचा सर्वागिन विकास केवळ मनसेच करू शकते या भावनेतुन आज अंबाजोगाई शहरातील भोई गल्ली परिसरातील व शहरातील इतर तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला ज्या मधे मनोज हिरवे, विशाल जिरंगे, सचिन भोकरे, बालाजी हिरवे, सागर जिरंगे, प्रदिप हिरवे, राहुल गवळी, महेश भुजंगे, समर्थ गवळी, रोहीत भोकरे, युवराज भुजंगे, योगेश भोकरे, रोहीत हिरवे, सोमनाथ भोकरे, अविनाश हिरवे, प्रविण भोकरे, रोहीत खैरमोडे, शुभम जिरंगे, कपील गवळी, अंबादास खैरमोडे, रवि कीरण राठोड, संतोष बडे, काशीनाथ धोत्रे, अरूण साळुंके, सौरभ साबळे, आमेश्वर यादव, तन्मय कुलकर्णी, अभिषेक नरवणे, आदींसह शेकडो तरूणांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस तर प्रमुख उपस्थितीत राजेंद्र मोटे जिल्हाध्यक्ष बीड, उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अमोल च०हाण, अंबाजोगाई शहराध्यक्ष गणेश अप्पा बरदाळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष नितिन भैया परदेशी, तालुका अध्यक्ष श्री कुलकर्णी, अमोद कुलकर्णी आदीं उपस्थित होते.
Comments
Post a Comment