श्रावण पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे अयोजन
मोफत नेञ तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
पु.भिक्खु धम्मशील थेरो यांच्या 11 व्या वर्षावासाचे अधिष्ठान प्रारंभ.
बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे.म्हणून प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला महाविहार धम्मभुमी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर शिवणी येथे विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात येते.
श्रावण पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा कालावधी वर्षावासाचा असल्याने पु.भिक्खु धम्मशील थेरो यांच्या 11 व्या वर्षावासाचे अधिष्ठान आजपासुन होणार आहे.त्यांच्या समवेत औरंगाबाद येथील पु.भिक्खु मंगलबोधी हेही वर्षावास अधिष्ठान करणार आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमीत डोंगरे यांचे चिरंजीव कु.शाश्वतच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन चंपावती नेञालयाच्या वतीने मोफत नेञ तपासणी व अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया शिबीराचे अयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पु.भिक्खु धम्मशील थेरो,पु.भिक्खु मंगलबोधी हे धम्मदेसना देणार आहेत.त्याच बरोबर आलेल्या सर्व उपासकांना संस्थेच्या वतीने भोजनदान खिरदान देण्यात येणार आहे.तरी उपरोक्त कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून धम्मदेसनेने लाभान्वीत व्हावे असे अवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment