पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी बस मिळाना म्हणून वारकरी पाटोदा बस स्टॅन्ड मध्ये तासनतास ताटकळत उभा होते नगरसेवक राजू भैय्या जाधव यांना समजताच तात्काळ वारकऱ्यांना जाण्यासाठी केली सोय


पाटोदा (गणेश शेवाळे) आषाढी एकादशी निमित्त पाठवून धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगडला जाण्यासाठी पाटोदा बस स्टैंड वर प्रचंड वारकऱ्यांची गर्दी झाली यामुळे वारकऱ्यांना जाण्यासाठी बसेस उपलब्ध नव्हत्या यामुळे आषाढी एकादशीला ज्यादा बसेस सोडण्यासाठी कर्तव्यदक्ष नगरसेवक राजू भैय्या जाधव यांनी पुढाकार घेत पाटोदा ते नारायणगड दर्शनासाठी जाणाऱ्या गाडया एसटी महामंडळ पाटोदा श्री खेडकर साहेब यांच्याकडे विनंती करुन एसटी बस उपलब्ध करून घेतल्या तसेच एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना बस स्टॅंडवर चहा व फराळीच करून वारकऱ्यांचे स्वागत करून दर्शन साठी पाठवले असल्यामुळे वारकर्याने आनंद साजरा केलाकार्यसम्राट नगरसेवक राजू (भैय्या) जाधव यांच्या पाठपुरावामुळे वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त नारायण गडाचे दर्शनाचे भाग्य लाभलं गाड्या कमी असल्यामुळे नारायण गडाकडे जाणार्या गाड्या बंद करण्यात आली होती परंतु राजू भैय्या जाधव ने तात्काळ पाठपुरावा केल्यामुळे दोन गाड्या सोडण्यात आल्या यावेळी पाटोदा ते नारायण गड बस स्थानकात गाडी निघताच वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत आनंद व्यक्त केला

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी