चिंचाळा येथे पंजाबराव डक यांचे शेती विषयक मार्गदर्शन



वडवणी प्रतिनिधी

वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे उद्या दिनांक 29 जून 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शेती विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना शेती विषयक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यायला हवी शेती मशागत कशा पद्धतीने करायला हवी पाण्याचे नियोजन आणि वापर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बी बियाण्यांचे करायचे नियोजन पिकांचे योग्य प्रकारे संगोपन औषधांची फवारणी खतांचा वापर आणि शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठीध कशाप्रकारे नियोजन करावे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचाळा येते महाराष्ट्राचे ख्यातनाम हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन चिंचाळा सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे तरीही या कार्यक्रमाला वडवणी तालुक्यासह परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान चिंचाळा सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी