शिक्षक हा शक्तीशाली व्यक्तीमत्व आहे-लक्ष्मण बेडसकर.


 केज प्रतिनिधी :केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रा आंतर्गत सेवापूर्ती गौरव समारंभ सत्कार या कार्यकरमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतःविधेची माता देवी सावित्रीबाई यांच्या प्रथमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केज पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,लक्ष्मणराव बेडसकर यांनी भूसविले. कार्यक्रमाचे प्रस्थावित लव्हूरी केंद्राचे केंद्रप्रमुख,राधाकृष्ण कांबळे यांनी केले. वयानुरूपी सेवानिवृत झालेले बळीराम महादेव शेरखाने व सौ.विश्रांती आणि रामराव काळे व सौ.शोभाबाई यांचा स्वप्तीनीक सत्कार करून दोघांना कपडेचा आहेर त्यांच्या शाळेकडून करण्यात आला. शेरखाने व काळे यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले, श्रीम.अश्विनी गिरी,श्रीम.छाया जाधवर,विक्रम डोईफोडे,श्रीराम देशमुख,श्रीराम चाटे,यांनी आपआपले मनोगत व्यक्त करताना शेरखाने सर, काळे सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षीय भाषनात बेडसकर म्हणाले की,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक लव्हूरी शाळेने ठेवलेला सेवा पूर्ती गौरव समारंभ सत्कार मुर्ती सेवानिवृत व बद्धली झालेल्या शिक्षकांना निरोप आणि नव्याने केंद्रात रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत असा विषेश कार्यक्रमाचे आयोजन केलेने केंद्राचे विशेष कौतुक केले, बेडसकर पुढे म्हणाले की शिक्षक हा शक्तीशाली व्यक्तीमत्व आहे, त्यांच्या हातुन ज्ञानदानाचे पवित्र काम होत असून अनेक पिढया घढवत आहेत.मराठी शाळा विरुद्ध इंग्रजी शाळा असा सामना करावा लागत आहे, जिल्हा परिषदच्या शिक्षकांची निवड स्पर्धतुन होते.त्यामुळे ते कोणतीही अहव्हाने स्वीकारून शैक्षणिक कार्य करू शकतात. कार्यक्रमास अंकुश मोराळे,राजाभाऊ कदम,गोकुळ सारूक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय चाळक,गणपत चाळक,गजेंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याधापक व शिक्षक आणि शिक्षीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहिद जवान उमेश नरसु मिसाळ व मयत प्राथमिक शिक्षक, वृषिकेत व्यंकटराव संगेवार यांना श्रद्धांजली वाहान्यात आली.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीने झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी