राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून,गोंदेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी



येवला, निफाड, :-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यास नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवस्मारक समितीच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे.

शिवस्मारक समिती गोंदेगाव यांच्या वतीने गोंदेगाव येथे १५ फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा साकारण्यात येत आहे. या पुतळ्याचा चौथरा एकूण ११ फुट इतका उंच असणार आहे. तसेच या पुतळ्याच्या परिसरात समितीच्या वतीने सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

आज गोंदेगाव येथील शिवस्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांची भेट घेऊन त्यांचे आभार मनात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, गोंदेगावचे सरपंच माधव जगताप यांच्यासह शिवस्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी