राजेंद्र मस्के यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार --पवन कुचेकर
राजेंद्र मस्के यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार --पवन कुचेकर
बालाघाटावर विविध सामाजिरक उपक्रमाचे आयोजन
बीड जिल्हा (प्रतिनिधी --गोरख मोरे ) : भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष भावी आमदार मा. राजेंद्रजी मस्के साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी दिली आहे.
बीड तालुक्यातील बालाघाटावर विविध सामाजिक उपक्रम घेवुन राजेंद्रजी मस्के साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप, तसेच ५१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे
तसेच वृध्द आश्रमात आधार म्हणून मदतीचा हातभार लावला जाणार आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment