पाटोदा महावितरण अधिकाऱ्यांच्या हम करे सो कायद्या कामकाजामुळे सामान्य नागरिक हैराण
पाटोदा महावितरण अधिकाऱ्यांच्या हम करे सो कायद्या कामकाजामुळे सामान्य नागरिक हैराण
दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा तीन गावातील सरपंचाची मागणी
पाटोदा (गणेश शेवाळे)पाटोदा महावितरणच्या हम करे सो कायद्या अशा कामकाजामुळे पाटोद्यातील नागरिक हैराण झाले असून महावितरणच्या कार्यालयात ग्राहक तक्रार घेऊन गेले असता उपकार्यकारी अभियंता उडवा उडवीचे उत्तर दित असून ग्राहकांना शासकीय कामात अडथळा आणतात म्हणून गुन्हा दाखल करु अशा धमक्या देतात आशी लेखी तक्रार भायाळा, नफरवाडी, येवलवाडी गावच्या सरपंच व नागरिकांनी केली आसून विविध गावात महावितरणने कसल्याही प्रकारची दुरूस्ती न करता कामे दाखवले जातात यामुळे दुरुस्तीच्या कामात उपविभागाला भेटलेल्या साहित्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येवलवाडी,भायाळा, नफरवाडी गावातील सरपंच व नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांची तक्रार कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडे केली आहे
Comments
Post a Comment