चिंचाळा गावकऱ्यांनी दिला शिक्षक दांपत्याला भावपूर्ण निरोप.



आष्टी /बीड (प़तीनिधी --गोरख मोरे ) :


चिंचाळा येथे कार्यरत असलेले रत्नाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ मंजुषा चव्हाण यांची बदली झाल्याने गावकऱ्यांनी मोठा समारंभ आयोजित करून भावपूर्ण निरोप दिला. रत्नाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांनी चिंचाळा या गावात नियुक्ती झाल्यापासून विद्यार्थी हिताचे व शाळा विकासा साठी अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. स्वतःची मुलगी त्यांनी याच शाळेत शिकवली त्यामुळे गावकऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेवर वरील विश्वास वाढला.चव्हाण सर यांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल केली प्रोजेक्टर, संगणक, टॅबलेट इत्यादी डिजिटल साधने शाळेमध्ये उपलब्ध असल्याने तसेच त्याचा प्रभावी वापर करण्याचं कौशल्य श्री चव्हाण सरांकडे असल्याने चिंचाळा येथून चांगले विद्यार्थी घडले. शाळा बरोबरच त्यांनी सामाजिक बाबतीत लोकांना जागृत केले स्वतःला दोन्ही अपत्य कन्या असल्याने लिंगभेद दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी लोकांना दाखवून दिले. त्याचा परिणाम असा झाला की, 2010 ते 14 या काळात शाळेच्या पटावर मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण खूप जास्त होते,ते 2022- 23 ला बदलून मुलींचे प्रमाण वाढलेले आहे.हे यश त्यांच्या कामाचा परिणाम आहे.गावातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून चौथीपर्यंत असलेली शाळा सातवीपर्यंत वाढवून काही दिवस विनावेतन काम करून जादा तासिका घेऊन ज्ञानदानाचे काम केले. गावकरी व पंचक्रोशीत चिंचाळा शाळा नावाजली. विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांचा विश्वास सर व मॅडम यांनी जिंकला. शैक्षणिक प्रवाहापासून दूर गेलेले विद्यार्थी व बेसिस्त वर्तन करणारे विद्यार्थी यांना योग्य प्रकारे मानसशास्त्रीय विचार समोर ठेवून प्रयोग केले व यशस्वी करून दाखवले. गेल्या दहा-बारा वर्षात या दोघांनी तन मन धनाने काम केले. गावकरी व आष्टीतील काही दानशूर व्यक्तींनी सरांच्या आव्हानाला दाद देत काही वस्तू दान केल्या त्यामुळे शाळा समृद्ध झाली आहे.
अशा सरांची व मॅडमची बदली झाल्याचे ऐकून गावकरी दुःखी झाले. बदली रद्द होते का यासाठी प्रयत्न केले परंतु या बदल्या राज्यस्तरावर होत असल्याने बदली अनिवार्य आहे.सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत निरोपाचा कार्यक्रम ठरवला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाधर पोकळे व उपाध्यक्ष राजू पोकळे यांनी पुढाकार घेत मोठा समारंभ आयोजित करत शिक्षकांना निरोप दिला.गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच पोलीस पाटील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थ भावुक झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या वेळेस ब्रह्मगाव केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक तसेच काही शिक्षक मंडळी सुद्धा उपस्थित होती. जाता जाता या शिक्षकांनी सांगितले की आपली मुलं आपल्या शाळेतच शिकवा. या शाळेतील मुलाच भविष्य यशस्वी होऊ शकत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी