एकसंघपणे आगामी सर्व निवडणुकीला समोर जाणार :- चंद्रशेखरजी बावनकुळे
सर्व घटक पक्षांना सोबत घेवून महायुती एकसंघपणे आगामी सर्व निवडणुकीला समोर जाणार :- चंद्रशेखरजी बावनकुळे
मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात महायुतीच्या घटक पक्षांची बैठक
दर महिन्याला घटक पक्षांची बैठक होणार -
चंद्रशेखरजी बावनकुळे
शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांची बैठकीला उपस्थिती
मुंबई (प्रतिनिधी) दि २८- महायुतीच्या घटक पक्षांची बैठक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली सदर बैठकीस एकूण नऊ घटक पक्षांचे नेते उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई , मंत्री उदय सामंत, भाजपचे नेते आ.प्रवीण दरेकर ,सरचिटणीस विक्रांत पाटील , शिवसंग्राम चे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, शिवसंग्राम सरचिटणीस विक्रांत आंब्रे, रिपाईचे नेते अविनाश माहातेकर ,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रयत क्रांतीचे प्रमुख सदाभाऊ खोत , रा स प चे काशिनाथ शेवते, जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम, पीपल्स रिपब्लिकन चे जयदीप कवाडे ,
बरीएम पक्षाचे चे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर बैठकीत शिवसंग्रामची भूमिका प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मांडली. त्यामधे प्रामुख्याने मराठा आरक्षण, शिवस्मारक त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न आदींचा समावेश होता.विविध पक्षांच्या नेत्यांनी देखील आपली माते मांडली
त्यानंतर बोलताना श्री बावनकुळे साहेबांनी दर महिन्याला मित्रपक्षांच्या समन्वयाची बैठक होईल. सर्व घटक पक्ष मिळून यापुढे मजबूत अशी महायुती एकसंघपणे आगामी सर्व निवडणुकीला समोरे जाईल . तसेच सर्व मित्र पक्षांना सत्तेचा योग्य वाटा ही दिला जाईल असेही श्री बावनकुळे यांनी सांगितले.
बैठकीनंतर शिवसंग्रामच्या विविध मागण्यांचे निवेदन शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. त्यावेळी भाजपा नेते आ. प्रवीण दरेकर व शिवसंग्रामचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते.
Comments
Post a Comment