मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही'



बीड  प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर येण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे मुंडे आगामी काळात आपल्याच पक्षाची कोंडी करणार आहेत.

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या जयंतीनिमीत्त बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हा निर्धार केला आहे. ते म्हणाले “मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. मी म्हटलं, फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असं सांगितलं होतं. आता ओबीसी आरक्षण वाचलं आणि लोकांनी गळ्यात हार घातले,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. “आपल्याला दूध पोळलेलं आहे. त्यामुळं आता ताकही फुंकण पिण्याची वेळ आली आहे. २०२४ हे इतिहास घडवणारं, म्हणजे, इतिहास बदलवणारं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांची नि:स्वार्थ साथ मला पाहिजे असेही मुंडे म्हणाल्या आहेत. एकंदरीत पंकजा मुंडे आगामी निवडणुकीत बंजारा समाजाबरोबरच मराठा समाजाची साथ मिळण्यासाठी चाचपणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू रंगली होती. तसेच खासदार प्रीतम मुंडे यांच्याएैवजी कराड यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे देखील मुंडे नाराज झाल्या होत्या. त्यामुळे आगामी काळात मुंडे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बीआएसने दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सिरीयसली बघितले नाही. मात्र, मी बघणार नाही, असं नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसनी न घेणं हा त्यांचा अपमान असतो, असं पंकजा म्हणाल्या आहेत. त्यामुळे मुंडे दबावाचे राजकारण करत आहेत. त्याचा फायदा होणार का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी