जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना दररोज हजारो झाडांची कत्तल !

जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना दररोज हजारो झाडांची कत्तल !

तात्काळ कारवाई करा नसता वन विभागाच्या दारात झाड लगाओ आंदोलन करणार - वर्षा जगदाळे

बालाजी जगतकर बीड-
जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना दररोज शहरात तीस ते चाळीस वाहनातून हजारो झाडांची कत्तली करत लाकूड आणला जातो, विभागीय आयुक्तांनी वन अधिकारी यांना तत्काळ झाडांची कत्तल रोखण्यासाठी आदेश देऊनही विभागीय वन अधिकारी गीते व वन अधिकारी काकडे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने हजारोच्या संख्येने बीड जिल्ह्यातील बंदी असलेल्या झाडांची कत्तली होत आहेत, याकडे तात्काळ वन विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर झाडे लगाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे.
शहरातील एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात स्वा मिल धारक आहेत, शहरात तब्बल 40 च्या आसपास स्व मील धारक कार्यरत असून जिल्ह्यात शासनाने बंदी घातलेले निम ,जांभूळ ,पिंपळ, वड चिंच, आधी झाडांना सर्रासपणे तोडले जात आहे, लाकूड मशीनवर पाहणी केली असता हजारो टन लाकूड बंदी असलेल्या झाडांची आढळून आले, विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना व वन विभागीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यात कुऱ्हाड बंदी असताना झाडांची कत्तली होत आहे याबाबत कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले असताना, विभागीय वन अधिकारी गीते व बीड तालुक्याचे अधिकारी काकडे या गोष्टीकडे साप दुर्लक्ष करत आहे, नेमके हे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, महाराष्ट्रभर सध्या पाऊस येत आहे मात्र जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली, यामागे जिल्ह्यात बेसुमार होत असलेली झाडांची कत्तली आहे, अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून लाकूड माफिया करोडो कमवत आहे. 
वन विभागाला दरवर्षी करोड रुपये जिल्हा नियोजन समिती मार्फत दिले जातात मात्र यातूनही मोठा भ्रष्टाचार होत आहे, वन विभाग म्हणजे कुरन बनले असून कोणीही येते हात साफ करून जात आहे. जिल्ह्यात असलेली कुऱ्हाड बंदी याची तात्काळ बजावणी न केल्यास वन विभागाच्या कार्यालयासमोर झाड लगाव आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी