चंद्रशेखर आझाद यांचे हल्लेखोर तात्काळ अटक करा नसता महाराष्ट्र पेटवू -डॉ जितीन वंजारे
1)जीवघेणे हल्ले दलीत नेत्यांवर च का होतात ?
2)इथे सरकार विरोधात बोलणाऱ्या लोकांचा आवाज दाबला जातोय त्यांना जीव मारलं जातय.
3)येथील नॅशनल मीडिया सरळ सरळ सत्ताधीश लोकांच्या दावणीला बांधलेला आहे
4)पानसरे, कुलबुर्गी,दाभोलकर प्रमाणे समाजहित पाहणाऱ्या लोकांना जिवे मारलं जातय त्यांच्या खुनाचा तपास होत नाही
5)देशात अराजकता आहे धर्मवाद आहे जातीयवाद प्रांतवाद आहे आणि मोदीजी बाहेरच्या देशात समानतेच्या गोष्टी करतात
6)येथील निवडणुका आल्या की सीमावर्ती भागात तणाव हल्ले घडवून आणले जातात,जातीय धार्मिक दंगली घडवल्या जातात आणि हे वास्तविक येथील नॅशनल मीडिया दाखवत नाही
7)जगाला युद्ध नको बुद्ध हवा असे सांगणारे मोदीजी देशातील दलितांवरील अत्याचारावर गप्प असतात.
8)चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सिक्युरिटी द्या त्यांच्या जीवितास धोका आहे ते दलितांचे मासिहा आहेत
बीड प्रतिनिधी/-उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथील देवबंद परिसरामध्ये भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद प्रवास करत असताना काही हल्लेखोराणी त्यांच्यावर गोळीबार केला या घटनेचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी डॉक्टर जितिनदादा वंजारे खालापूरीकर जाहीर निषेध करतो. भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आजाद संबंध भारतामध्ये दलित अत्याचारातील प्रकरणांमध्ये सक्रिय भाग घेऊन गावोगावी खेडोपाडी प्रत्येक राज्यामध्ये जिथे अन्याय घडेल तिथे तात्काळ भेटी देऊन तेथील पोलीस यंत्रणेला व न्यायिक यंत्रणेला सज्ज करून स्वतःच्या संघटनाच्या बळावरती भारत देशामध्ये दलित,वंचित, शोषित, पिडीतासाठी मसीहा म्हणून काम करत असलेले भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी काही समाजकंटक मनुवादी भडव्यांनी भ्याड हल्ला केला.हा हल्ला पूर्व निवोजीत असून यामध्ये बंदुकी व इतर शस्त्र वापरले गेले. चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीच्या काचा फुटल्या व गाडीवर इतर ठिकाणीही गोळ्यांचा वर्षाव केला गेला यामध्ये दोन राऊंड फायर केले गेले त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना कमरेला एक गोळी चाटून गेली.भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये जाऊन भारतामध्ये कशी सामाजिक एकता आहे याचे दाखले देत आहेत,आम्ही कसे एकत्र आहोत आमच्यात कसा सामाजिक सलोखा आहे , तीन तलाक कसा नष्ट केला,370 कसा लागू केला ह्या वाचाळ गोष्टी बाहेरच्या देशामध्ये सांगून भारतामध्ये बंधुता एकता समानता आहे असे सांगतात पण प्रत्यक्षात मात्र हिंदू राष्ट्राची घोषणा करण्यासाठी व संविधान बदलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांच्याच पक्षातील काही मनुवादी लोक व्यस्त आहेत. मी भारताचा सुजाण नागरिक या नात्याने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की दलित शोषित पीडित समाजावर येथील सो कॉलड उच्चवर्णीयांचे झालेल्या अन्यायाचा आणि अत्याचाराचा एक आलेख तयार करा,त्या अत्याचार अन्यायाच्या घटनांमध्ये किती लोकांना न्याय दिला याचाही एक आलेख तयार करा, येथील खरे आणि सच्चे बोलणाऱ्या लोकांचा कसा आवाज दाबला जातो याचाही एक आलेख तयार करा,येथे असणाऱ्या अठरापगड जाती धर्मातील लोकांवर येथील मनुवादी कुत्र्यांचा कशा पद्धतीने अत्याचार अन्याय होतो याचाही एक आलेख तयार करा,तुमच्याच पक्षातील लोकांकडून स्रीयांवर होणारे बलात्कार अन्याय अत्याचार यावरही आलेख तयार करा आणि मग खुशाल जा अमेरिकेमध्ये किंवा जगातील प्रत्येक देशामध्ये आणि खर खर सांगा की आमच्या देशामध्ये अशा पद्धतीचे दहशतीचे वातावरण आहे, बंधुभाव पुरता हरवलेला आहे ,लोकशाही मेली आहे ,संविधानाच्या आम्ही चींधड्या उडवल्या आहेत.देशात दिवसा ढवळ्या खून होतात पानसरे, कुलबर्गी, दाभोलकर येथे दिवासाढवळ्या मारले जातात आणि त्यांचे आरोपी पकडण्यात माझी छप्पन इंचाची छाती असर्थ आहे.आम्ही मात्र शंड होऊन नुसतं पाहत राहतो . आमची छप्पन इंचाची छाती इथे म्यान होते . कारण आम्ही येथील नॅशनल मीडिया विकत घेतलेला आहे .मिडीयाला हे दिसत नाही हेही सांगा ना ......! याची तुम्हाला कदाचित लाज वाटत असावी म्हणून बुद्धाला समोर करून विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा अस सांगणाऱ्या सन्माननीय मोदी ना देशातील अराजकता दिसत नाही काय ? नुसतं बोलण्यापुरतं आम्ही समानता पाळतो, आमचा भारत देश मोठी लोकशाही आहे असं बोलून चालणार नाही प्रत्यक्षात भारतामध्ये दलित, शोषितांवर, पिडीतांवर,गरिबांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत ते अतिशय गंभीर असून यामुळे देशाची फाळणी झाल्याशिवाय राहणार नाही.येथील धर्मवादामुळे देश बरबात होईल .निवडणूक आल्या की जातीय दंगली घडवणे ,परकीय देश्याचे हल्ले ठरवून वाढवणे, सीमावर्ती भागात तणाव निर्माण करणे.हे सर्रास याच मोदी योगी सरकार कडून घडत आहे .यामुळे भारताचे नागरिक वेगवेगळ्या धर्मांमध्ये, जातींमध्ये, गटामध्ये वाटली जाऊन देशाच्या फाळणीला आणखी बळ मिळून अखंड भारताचे आणखी किती तुकडे करणार आहात ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला.उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुंडांचे घर पडतो अस एकल असताना त्यांच्याच राज्यात इतकी गुंडशाही वाढली की चंद्रशेखर आझाद सारखा दलीत नेता पूर्ण ताफ्यासकट जात असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार होतो त्यात त्यांना गंभीर जखमी व्हावं लागतं.भगवे कपडे घालून गुंडांची सफाई करणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूर येथील घडलेल्या गोळीबार कांडावर कठोर कार्यवाही करून या कटात असणारे आरोपी खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकून त्यांची घरे बुलडोझर ने पडून त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि नंतरच नाकाने शेंगा सोला नसता हल्लेखोरांवर कठोर कार्यवाह न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटवू अशी ग्वाही दलीत नेते तथा समतेचे पुरस्कर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिली.तेथील पोलीस यंत्रणा झोपा काढते की काय ? एव्हढ्या मोठ्या ताफ्यामध्ये हत्यार बंदुका घेऊन आरोपी येतातच कसे ? का पोलीस यंत्रणा यात सामील आहे ? मोदी आणि योगी फक्त आरएसएस चेच न्यायकरू आहेत की काय ? कायदा हातात घेणारे गुंड कुठवर पोसणार आहात ? इतर लोकांवरील अन्याय अत्याचार त्यांना दिसत नाहीत की काय ? ते सर्वधर्म समभाव, बंधुता, लोकशाही,एकता, स्वातंत्र्य,देशभक्ती,सार्वभौम,नाय व्यवस्था इत्यादी नीती मूल्यावर आणि संविधानिक बाबींवर तुम्ही लक्ष देणार आहात का नाही ? का नुसतेच जगभर बुंगारा द्यायचा स्वतःची वाऱ्यावर सोडून लोकांच्या बायाना हिरे माणिक मोती वाटप करायचे,देशातील धर्मवाद वाढवून बोलणाऱ्या लोकांचा आवाज गोळी घालून दाबायचा हेच करणार आहात काय ? हे कुठेतरी थांबवा आणि चंद्रशेखर आझाद यांच्या हल्लेखोरांना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्या .चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सिक्युरिटी द्या.चंद्रशेखर आझाद वंचित समूहाचा देशातील सर्वात पावरफुल नेता असून त्यांच्या जीवितास धोका झाल्यास आक्खा देश होरपळून निघेल त्यामुळे योगिजिनी हल्लेखोरांचा तात्काळ बंदोबस्त करून भीम आर्मी चे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांना कांगणाला दिल्याप्रमाणे झेड प्लस सिक्युरिटी द्या असा सल्ला यावेळी डॉ जितीनदादा खालापूरीकर यांनी दिला.
Comments
Post a Comment