देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने उद्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा



बीड, दि.२८ (प्रतिनिधी ) बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने उद्या दि.३० जून, शुक्रवार रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शुक्रवार दि.३० जून रोजी सकाळी ११ वाजता गुणवंताचा सत्कार समारंभ होणार आहे. देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीपजी रोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास नायब तहसीलदार सुहास हजारे, जि. प. चे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जर्नादनदादा मस्के, तुलसी संगणक व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लंकेश्वर थोरात, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी बेद्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गुणवंत विद्यार्थ्याच्या या सत्कार सोहळ्यास विद्यार्थी, शिक्षक, पालक, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवगिरी प्रतिष्ठाच्या वतीने करण्यात आले आहे .
 


 नोबल हजारे यांचा विशेष सत्कार

देवगिरी प्रतिष्ठानच्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये
तैवान देशात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल नोबेल उत्तम हजारे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी