वडवणी मध्ये खाजगी सावकार असणाऱ्या शिक्षकाच्या घरी धाड



आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात, वडवणी तालुक्यात खळबळ

वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी

  :- वडवणी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खाजगी सावकारकी ने डोके वर काढले असल्याची ओरड होत होती.
 त्याच अनुषंगाने पेशाने शिक्षक असणाऱ्या खाजगी सावकराच्या घरी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडवणी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाचे आधिकारी व पोलीसांनी छापा टाकत आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सावकार असलेल्या सदरील शिक्षकाला ३० जून पर्यत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे.अशी माहिती. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे प्रमुख शिवराज नेहरकर यांनी दिली आहे.
     वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील रमेश अंबादास बडे यांनी एक महिन्यापुर्वी अवैद्य सावकरी बाबत शिक्षक असणारे शहादेव बळीराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार यांची मालकीची एक हेक्टर जमीन ही खाजगी सावकार असलेल्या शिक्षकाने काही रकमेअंती जमीनीचे खरेदी खत करुन घेतले होते .या तक्रारी चा अर्ज मिळतात काल सकाळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे आधिकारी व कर्मचारी सह पोलीसांनी शहादेव मुंडे यांच्या वडवणी येथील शिक्षक काँलनी येथील राहत्या घरी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सावकारी कायद्याच्या तरतुदी नुसार धाड टाकली.या तपासा अंती काही आक्षेपार्ह कागदपत्रे हाती लागली आहेत ती ताब्यात घेतली आहेत. तर याबाबत शहादेव मुंडे यांना ३० जून पर्यत आपले म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे.यानंतर कारण काय हे स्पष्ट होणार आहे. शिक्षकाच्या घरी धाड पडल्याने वडवणी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे प्रमुख शिवाजी नेहरकर यांच्यासह आर.डी.शिंदे, निवांत सस्ते, पोलीस स्टेशनचे चव्हाण,जाधव व महीला पोलीस कर्मचारी पवार या आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाड टाकली आहे.

वडवणी तालुक्यामध्ये एक ही सावकार परवानाधारक नाही तालुक्यामध्ये सावकारकीचा अधिकृत परवाना एक ही नाही

खाजगी सावकाराकडून कुणाची फसवणूक किंवा पिळवणूक होत असल्यास अशा व्यक्तींनी निर्भयपणे पुढे येऊन खाजगी सावकारा विरोधात तक्रार द्यावी. तक्रारीनुसार अवैध सावकारा विरुद्ध महाराष्ट्र सावकार नियम व अधिनियम २०१४ नुसार योग्य ती कारवाई करू

 शिवराज नेहरकर
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडवणी

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी