पत्रकारिता क्षेत्रातील कोहिनूर हिरा "युवा पत्रकार नितिन भोंडवे"


बीड प्रतिनिधि: अंकुश गवळी

सध्या वाढत्या महागाई मुळे अनेक न्यूज पेपर मोडकळीस आले आहेत,अश्या सर्व अडचणी ला सामोरे जात पत्रकारिता करणे,पत्रकार होयच तेवढच सोपं, पण पत्रकारिता करीत असताना येणाऱ्या संकटाना समोर जाणं पण तेवढंच आवघड आहे आस माझं मत आहे.मी एका पत्रकाराचा संघर्षमय जिवन प्रवास जवळून पाहत आलो आहे.आणि तो पत्रकार  "सर्वसामान्य कुटुंबातून पत्रकारिता क्षेत्रात गगन भरारी घेणारा आवलिया युवा पत्रकार नितिन भोंडवे".
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पिठ्ठी या गावी  1 जुलै 2000 रोजी ,वडील - बबन भोंडवे व आई - आशाबाई भोंडवे,मोठा भाऊ - सतिश भोंडवे अश्या एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला .त्यांचे 1 ते 4 थी प्राथमिक शिक्षण खोमनेवस्ती येथे पार पडले.नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण 5 वी ते 12 वी जवाहर विद्यामंदिर निरगुडी येथे झाले.येथे शिक्षण घेत आसताना ते विविध स्पर्धा मध्ये भाग घेत अव्वल क्रमांक पटकावत असतं.माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,बीड येथे प्रवेश घेतला.आणि खऱ्या अर्थाने तेथून पत्रकारितेला सुरुवात झाली. आय टी आय मध्ये प्रशिक्षण घेत आसताना त्यांना विविध आणुभव आले.संस्था मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (National Service scheme ) माध्यमातून कॅम्प मध्ये जाऊन गावागावात पाणी फाउंडेशनच्या योजनेतून कामे केली.
हे सर्व दैंनदिन जीवनात घडत आसताना मनात एक विचार आला. समाज्यात वावरताना  गोरगरीब लोकांना अनेक अडचणी ला सामोरे जावे लागते,अन्याय ,अत्याचार होतो.आणि हे प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर, आपल्याला पेन हातात घ्यावा लागेल,आणि निःपक्ष व निर्भिड लिखाणातून प्रशासनास जाग आणून देण्याचं काम करावं लागेल.आणि आय. टी. आय. मधून पाहिल्या चळवळीला सुरुवात झाली.प्रशिक्षण घेत असताना मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एस. एफ. आय.(SFI) च्या माध्यमातून पहिला मोर्चा काढण्यात आला.आणि त्या मोर्च्यात आय टी आय च्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत मुलांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी त्या छोट्याश्या वयात केलं.तेव्हापासून गोरगरीब लोकांवर वर होणारा अन्याय, अत्याचार विरोधात आपल्या लेखणीच्या स्वरूपाने, बातम्या प्रकाशित करून त्याना न्याय मिळवून देण्याचं काम ते करत आहेत.अनेक मूलभूत प्रश्न ते शासन दरबारी मांडून  सोडवत आहेत, एका सामान्य कुटुंबातील मुलगा अत्यंत कमी वयात पाटोदा तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात *एक अस्सल हिरा* म्हणून ओळखले जात आहेत.त्यांनी सामान्य कुटुंबातून संघर्ष करून स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.त्यांच्या हातून जी समाजसेवा घडत आहे ती येथून पुढे ही घडत राहो.तालुक्यासह इतर जिल्ह्यात ही "युवा पत्रकार नितिन भोंडवे" म्हणून ओळखले जाणारे  मा. युवा पत्रकार नितिन भोंडवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......!!

               शब्दांकन
            सुरज खोमणे
        मो.8010424356

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी