चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला होण्याची कारणे आणि त्या पाठीमागील सूत्रधार कोण असेल?( अनंत सरवदे )

दिनांक 28 जून 2023 रोजी यूपीच्या सहारनपुरच्या "देवबंद" विधानसभा क्षेत्र येथे आझाद समाज पार्टीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर पाच राऊंड फायर करून गोळीबार झाला.

  त्या पूर्वी चंद्रशेखर आजाद यांची थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. चंद्रशेखर आजाद पश्चिमी उत्तर प्रदेशच्या सहारनपुर जवळच्या एका ग्रामीण भागातले. यूपीमध्ये "ठाकूर" (राजपूत )आणि "जाट" या स्वतःस क्षत्रिय समजणाऱ्या दोन प्रभावी जाती आहेत. त्यानंतर दलित समाजातील जाटव, चांभार , वाल्मिकी, भंगी व अन्य छोट्या अनुसूचित जातीची संख्या आहे

 लक्षणीय आहे. NCB च्या आकडेवारी प्रमाणे भारतात उत्तर प्रदेश मध्ये दलित, पिछडा समूहावर अन्याय अत्याचार, बलात्कार आणि हत्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे

 या पूर्वी बीएसपीच्या मायावती 3 जून 1995 ते 18 /10 /1995 (137 दिवस ), 21 मार्च 1997 ते 20 सप्टेंबर 1997(184 दिवस ) 3 मे 2002 ते 29 ऑगस्ट 2003( एक वर्षे 118 दिवस) आणि 13 मे 2007 ते 16 मार्च (पूर्ण बहुमत काळ )2012 पर्यंत म्हणजे एकूण 7 वर्षे 16 दिवस एवढ्या कालावधीसाठी उत्तर प्रदेशच्या4 वेळा मुख्यमंत्री राहिल्या. सत्ता कालावधीमध्ये अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात घट झाली.

 पण पुढे मार्च 2012 पासून 2017 पर्यंत समाजवादी पार्टी सत्तेवर आली. आणि पुन्हा एकदा नव्याने उत्तर प्रदेशात दलिता वरील अन्याय अत्याचाराच्या मालिकेने उचल खाल्ली, जोर धरला.

 दिनांक 21 जुलै 2015 रोजी चंद्रशेखर आझाद, विनय रतन सिंग, (अध्यक्ष )आणि सतीश कुमार यांनी भीम आर्मीची स्थापना केली. अल्पावधीतच चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीचे जाळे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, आणि नवी दिल्ली येथे पसरवले. अन्यायाला जशास तसे उत्तर देण्याची मानसिकता दलित तरुणांमध्ये तयार झाली. भीम आर्मीची सदस्य संख्या बघता बघता 1 तें 3 लाखाच्या आसपास गेली. पुढे 2017 पासून भाजपचे योगी आदित्यनाथ ( अजय कुमार बिष्ट ठाकूर राजपूत ) हे कट्टर हिंदुत्ववादी यूपी चे मुख्यमंत्री बनले.

 दिनांक 20 एप्रिल 2017 रोजी सहारनपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यावरून दलित विरुद्ध ठाकूर(राजपूत )असा मोठा तणाव निर्माण झाला. दिनांक 5 मे 2017 रोजी महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्याचे कारण पुढे करून सहारनपुर मध्ये दंगल घडवून आणली. तिथे 25 जाटव समुदायाची घरे जाळण्यात आली. तिथे झालेल्या हिंसाचारात एक ठाकूर आणि एक दलित ठार झाले. पुढे दिल्लीतील जंतरमंतरवर 9 आणि 17 मे रोजी हजारो लोकांनीं धरणे आणि निदर्शने केली. चंद्रशेखर आझादचीं उपस्थिती आणि आक्रमक भाषण शैली या मुळे नेतृत्व विकसित झाले

 सहारनपुर दंगलीचा ठपका चंद्रशेखर आझाद वर लावून त्यांना जून 2017 मध्ये अटक झाली. नोव्हेंबर 2017 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना जामीन दिला. तरी यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय सुरक्षा(NSA )कायद्याखालीअटक करून पुन्हा तुरुंगात टाकले. उत्तर भारतातल्या सर्व राज्यांमध्ये चंद्रशेखर आझाद च्या समर्थनार्थ धरणे आंदोलन आणि निदर्शने झाल्यामुळे सप्टेंबर 2018 ला उत्तर भारतात दबाव निर्माण झाला

 त्यांची तुरुंगातून सुटका झाली
 
 दिनांक 15 मार्च 2020 रोजी चंद्रशेखर आजाद यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, आणि राष्ट्रीय लोकदल मधील अनेक नाराज असलेले सुमारे 98-तें 150 हुन अधिक आजीं - माजी पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पक्षात आवक सुरू झाली.
   उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील अनेक अन्याय अत्याचार आणि पक्ष संघटनेच्या कामात भीम आर्मीचा तरुण क्रियाशील झाला.

     दरम्यान महिला कुस्तीगीरांचे यौन शोषण प्रकरणानें दिल्लीच्या जंतर-मंतरवर 35 दिवसाहून अधिक दिवसांचें धरणे आंदोलन वेग घेऊ लागले
 खासदार ब्रज भूषण शरण सिंह (WFI अध्यक्ष ) यांच्या विरोधातआणि पिढीतांच्या बाजूने जोर धरला. तेथे चंद्रशेखर आजाद यांनी भेटी देऊन महिलायौन शोषित पैलवानांचा आवाज बुलंद केला

   दिनांक 28 मे 2023 रोजी दिल्लीच्या पोलिसांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनास अडथळा नको या निमित्ताने धरणे आंदोलनात बसलेल्या महिला कुस्तीगिरांची धर पकड करून अटक केली. पोलिसी अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हरियाणा - सोनीपत जिल्ह्यातील" मुंडलांना" येथे 4 जून 2023 रोजी महिला कुस्तीगिरांना न्याय मिळवून देण्यासाठी महापंचायत बोलावण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा मुजफ्फरपुर, हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एक आणि तीन जून 23 रोजी महिला कुस्तीगिरांच्या समर्थनार्थ महापंचायती झाल्या होत्या

    4 एकर जमिनीमध्ये मोठ्या पेंडॉलमध्ये भरलेल्या या महापंचायतीमध्ये यूपी,राजस्थान झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथून भारतीय किसान युनियनचे हजारोंच्या संख्येने जाट -जाटव जनसमुदाय जमला. कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे तिथे होतेच. भारतीय किसान युनियनचे गुरुनाम सिंह चढूनी, जम्मू काश्मीरचें माजी राज्यपाल सत्यपाल मलिक, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी, सतपाल चौधरी आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तिथे चंद्रशेखर आजाद यांनी महिला कुस्तीपट्टूच्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली भाषण केले. " बेटीयों की अबरू के लिए जान लुटा देंगे ". हम पगडी से नही खेलने देंगे, हमारी बहनों की इज्जत बचाने मे हम अगर कामयाब नही होंगे तो पगडीयोंको (जाट ) इकठ्ठा करने की जरूरत है! बहनों की सम्मान की रक्षा करो! हमारा मुकाबला गुंडोंसे,मवालीयोंसे, बदमाशों के साथ है! जरूरत पढीतो उन लोगों को घसीटकें लाना पडेगा!

 चंद्रशेखर आझादच्या या जोष पूर्ण भाषणामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश पश्चिमी उत्तर प्रदेश, दिल्ली या भागातील जाट आणि जाटव समुदायांमध्ये चंद्रशेखर आजाद ची लोकप्रियता शिखरावर गेली होती.

 कदाचित ही लोकप्रियता खा. ब्रजभूषण सिंह आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय सत्तेला आव्हान देणारी असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या राजकीय साम्राज्याला मोठा हादरा बसणारी असण्याची शक्यता अधिक ग्राह्य धरून त्यांच्या समर्थकांनी जातीय द्वेषाच्या आधारे दिनांक 28 जून 2023 रोजी चंद्रशेखर आझाद यांची हत्या करण्याच्या दृष्टिकोनातून सहारनपुरच्या "देवबंद" इथे 5 राऊंड फायर करून हल्ला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही

 या जीव घेण्या हल्ल्याचा निषेध तर झाला पाहिजे. पण चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊन हल्ल्याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. भारताच्या (CBI )गुन्हा अन्वेषण शाखेद्वारे या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देशभरातून होत आहे.

( अनंतराव सरवदे, से.नि. तहसीलदार तथा लेखक:- विद्रोह वंचितांचा बीड )3062023

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी