अफवा कि चमत्कार, प्रशासन मात्र अभिज्ञ,चिंचाळ्यात जमिनीतून महादेवाची पिंड निघाली
वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी
:- शेती बांध जमिनीतून महादेवाच्या पिंडीची मुर्ती निघालाची घटना वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे काल दुपारच्या दरम्यान घडली आहे. सदरील घटना अफवा कि चमत्कार असा प्रश्न उपस्थित राहत असून याबाबत वडवणीचे स्थानिक आणि संबधित विभाग मात्र अभिज्ञ असल्याचे पाहवयास मिळत आहे. याठिकाणी गांवकरी दर्शनासाठी गर्दी करत असल्याच दिसून येत आहे.
याबाबत विश्वासनीय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील मौजे चिंचाळा याठिकाणी परडी माटेगांव रोड लगत एका शेतकऱ्याच्या शेती बांधावर काल सोमवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जमिनीतून महादेव पिंडीचे अचानक दर्शन झाले असल्याची माहिती चिंचाळा गांवभर पसरली. यानंतर गांवकऱ्यांनी देखील घटनास्थळी जाऊन मुर्तीची पुजा आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. सदरील मुर्ती हि नवी कोरी असल्याच देखील बोलल जात आहे.आज देखील भाविक-भक्त पिंडीचे दर्शन घेताना दिसून येत आहेत. तर सदरील प्रकार अफवा कि चमत्कार आहे. याबाबत वडवणीचे स्थानिक प्रशासन आणि संबधित विभाग मात्र अन्नभिन्न असून या घटनास्थळी काल आणि आज दुपारी बारा वाजेपर्यत कोणीच पाहणी करण्यासाठी आले नसल्याचे माहिती मिळाली आहे.आज देखील याठिकाणी चिंचाळासह परिसरातील भाविक-भक्त मोठ्या संख्येनी गर्दी करत असून अभिषेक करत दर्शन घेत असल्याच दिसून येत आहे.
वडवणीचे तहसिल म्हणाले कि...
वडवणीचे तहसिलदार संभाजी मंदे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे याबाबत विचारणा केली आसता म्हणाले कि, चिंचाळा येथील शिंदे नामक व्यक्तीच्या आंगात येत असून शेतीमधील माती काढली तर मुर्ती निघाली आहे.अशी माहिती मिळाली असून याठिकाणी कालच तलाठी यांना पाठवले असून याबाबत तलाठ्यांना विचारवे लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Comments
Post a Comment