पंढरपूरजवळ माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने संत वामनभाऊ दिंडीला महापंगत

पंढरपूरजवळ माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने संत वामनभाऊ दिंडीला महापंगत


अत्यंत पवित्र,उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संत वामनभाऊंचा पालखी सोहळा --माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी /बीड ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : 



 संत वामनभाऊंच्या लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरीच्या वाटेवर अत्यंत पवित्र मनाने तल्लीन होऊन मार्गस्थ असतानाच दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी आ.भीमराव धोंडे यांनी पंढरपूरजवळ माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने संत वामनभाऊ दिंडीला महापंगत दिली.या पालखी सोहळ्यात माजी आ.धोंडे हे परवा काही अंतर पायी चालले आज मंगळवार दि.२७ जुन रोजी महापंगत दिली.अध्यात्म परंपरेमध्ये धोंडे घराण्याची वारीची सेवा करण्याची परंपरा माजी आ.भीमराव धोंडे यांनी सातत्याने जपली आहे.महाराष्ट्राच्या संत परंपरेने पावन अशा भूमित पंढरीच्या वारकऱ्यांना स्नेहभोजन देऊन कर्तव्य निभावण्याची कर्तव्य भावना अत्यंत पवित्र मनाने गेल्या १२ वर्षापासून माजी आ.
भीमराव धोंडे यांनी जपली आहे. महाराष्ट्रातील संतांनी सांगितलेला समता , बंधुत्व,ऐक्याचा संदेश यापुढेही आपण जतन करूयात,संतांचा समतेचा संदेश पुढे नेऊया असे सांगत अत्यंत पवित्र,
उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संत वामनभाऊंचा पालखी सोहळा अशी पावित्र्यपूर्ण भावनिक साद माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिली.
  श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथकर यांंच्या नेतृत्वाखाली गहिनीनाथगड ते पंढरपूर असा पायी दिंडी पालखी सोहळा आज मंगळवार दि.२७ जुन रोजी पंढरपूर जवळ असलेल्या पखालपूर गणपती मंदीर येथे दुपारी २ वा. पोहचला.येथे परंपरेप्रमाणे माजी आ.भीमराव धोंडे यांंच्यावतीने ५० हजार वारक-यांना भोजन दिले. यावेळी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,
अजयदादा धोंडे,
अभयराजे धोंडे,राजेंद्र धोंडे,माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड,
ॲड.वाल्मिकतात्या निकाळजे,रामराव खेडकर,रामदास बडे,बाबुराव केदार,
अशोक साळवे,सरपंच सावता ससाणे, विठ्ठलराव बनसोडे, पांडुरंग नागरगोजे,
नवनाथ सानप, ॲड.
रत्नदीप निकाळजे,प्रा.
दादासाहेब झांजे,एन.टी.
गर्जे, उत्तम बोडखे, पांडुरंग गावडे,
बाळासाहेब पवार, शिवाजी नाकाडे,एम.एम.
बडे,देवा गरकळ,रघुनाथ शिंदे,चंद्रशेखर साके, महारुद्र खेडकर, आबासाहेब भोसले,
यासीन शेख,संजय नालकोल,बाबु कदम,
प्राचार्य डॉ.डि.बी.
राऊत,शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे,
बाजीराव वाल्हेकर,
ॲड.भाऊसाहेब सायंबर,आण्णासाहेब लांबडे, शिवाजी थोरवे,
इंजि.पी.बी.बोडखे, माऊली माऊली बोडखे,
आजिनाथ बेल्हेकर,
आसाराम बडे महाराज,
गहिनीनाथ खेडकर महाराज,आजिनाथ लाड महाराज,रामशास्त्री वनवे महाराज,शिवाजी वनवे महाराज ,संजय शेंडे हनुमंत कावळे,ॲड.
भाऊसाहेब लटपटे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की, वारकरी संप्रदायात ज्ञानापेक्षा साधनेला महत्त्व असते.जीवनातील अहंकार नष्ट केला पाहिजे.अहंकार हा वारीमुळेच नष्ट होतो असेही माजी आ.
भीमराव धोंडे म्हणाले. यंदाच्या अत्यंत पवित्र, उत्साही आणि भक्तीमय वातावरणामध्ये निघालेल्या संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळ्यात हजारो भाविक दिंडीत आहेत.या सोहळ्यात माजी आ.भीमराव धोंडे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी झाले.संत वामनभाऊ महाराजांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाला माणुसकीचा धर्म शिकवला.शिक्षणाचे महत्त्व सांगून समता, बंधुत्व, ऐक्य आणि सर्वधर्म समभावाची शिकवण दिली अशा या श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावरील महंत विठ्ठल महाराजांच्या नेतृत्वाखालील असंख्य विविध जाती,धर्म,पंथांचे वारकरी अत्यंत गुन्या गोविंदाने श्रद्धेने पंढरीत दाखल झाले आहेत.



माजी आ. भीमराव धोंडेंना वारकऱ्यांच्या आशीर्वाद

    माजी आ.भीमराव धोंडे हे अनेक वर्षांपासून परमार्थ क्षेत्राशी निगडित आहेत.संत वामनभाऊ महाराज हे त्यांचे आराध्य श्रद्धास्थान आहे.दरवर्षी निघणाऱ्या श्रीक्षेत्र गहीनाथगडावरील दिंडीला ते महापंगत देतात.यंदाही त्यांनी पखालपूर येथे अत्यंत पवित्र आणि मनोभावे महापंक्तीचा स्वाद निस्वार्थ भावनेने दिला.यावेळी अत्यंत साध्या भोळ्या आणि विविध जाती धर्म पंथांच्या गरीब सामान्य वारकऱ्यांशी संवाद साधत आणि सोबत बसून त्यांनी पंक्तीचा आनंद घेतला.भाऊंच्या भक्तांनी माजी आ.भीमराव धोंडे यांना आशीर्वाद दिला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी