हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा.. चव्हाण कृष्णा
वडवणी प्रतिनिधी
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती 01 जुलै रोजी प्रत्येक तांड्यात वाडी वस्ती व पालावर जयंती उत्साहात साजरी करून आपला स्वाभिमान जागृत ठेवावा
असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व चव्हाण कृष्णा यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय वसंतराव नाईक त्यांचा सिंहाचा वाटा आहे राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि अनेक वर्षापासून आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित असलेल्या घटकांना विकासाच्या प्रवर्तन यासाठी कसोशीने प्रयत्न केले शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली पाहिजे त्यासाठी जाणीवपूर्वक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले रोजगार हमी योजना कृषी विद्यापीठ स्थापना नवनवीन धरण औष्णिक उपकेंद्र अशी एक नव्हे तर अनेक योजना राबवली आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या कल्याणासाठी विशेष योजना राबविल्या पंचायत राज सारखी महत्वाची योजना त्यांनी सुरू केली त्यामुळे महाराष्ट्र त्यांचे ऋण कधीच विसरू शकणार नाही एक जुलै रोजी नाईक साहेबांची 110 जयंती वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आव्हान युवा नेते चव्हाण कुष्णा यांनी केले आहे....
Comments
Post a Comment