चिंचाळा येथे जमिनीतून वर आली महादेवाची पिंड
चमत्कार झाल्याने गावकऱ्यांची पाहण्यासाठी गर्दी. मूर्ती पाहण्यासाठी चिंचाळा गाव शेतकऱ्यांच्या रानात
वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी
वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे सोमवार रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अरुण शिंदे यांच्या शेतामध्ये महादेवाची पिंड जमिनीतून वर आल्याची सांगण्यात येत असल्याने चिंचाळा गावातील आणि परिसरातील महिला पुरुष सह पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
अरुण शिंदे यांचे शेत गावापासून जवळच परडी माटेगाव रस्त्यालगत आहे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाखाली महादेवाची पिंड निघाल्याचे लहान मुलांच्या लक्षात आले. ही माहिती गावात समजतात महिला पुरुषांनी पिंड पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असुन खरोखरच महादेवाची पिंड जमिनीतून निघाली असल्याचे अधिकृतपणे पुरातत्त्व विभागाने जाहीर केलेले नाही.
Comments
Post a Comment