डिप्लोमा इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजीमहाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सुप्रिया गोरख सुपेकर हीची नामांकित कंपनी Google नंतर आता Malaysia मध्ये AIA या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये Manager म्हणून निवड
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित,डिप्लोमा इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी आष्टी गंगाईनगर आनंद शैक्षणिक संकुल मधिल महाविद्यालयाची आष्टी येथील विद्यार्थीनी कु. सुप्रिया गोरख सुपेकर हीची नामांकित कंपनी Google नंतर आता Malaysia मध्ये AIA या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये Manager म्हणून निवड झाली आहे या झालेल्या निवडी बद्दल आज आनंद चॅरिटेबल संस्था संचलित,डिप्लोमा इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी आष्टी गंगाईनगर आनंद शैक्षणिक संकुल मध्ये आज सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्काराला उत्तर देताना इंजिनिअर कु . सुप्रिया सुपेकर म्हणाल्या की माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती माझ्याकडे डिप्लोमा व डिग्री कालेज साठी पैसे नव्हते मि पार्ट टाईम नौकरी करून मि जिद्द व चिकाटीने अभ्यास करून माझे शिक्षण पुर्ण करून आज मी मलेशिया या देशात
माझी मॅनेजर म्हणून माझी निवड झाली आहे माझे अभिनंदन व सत्कार आष्टी येथे सर्व खुप ठिकाणी झाले पण मी ज्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये खुप काही शिकले या यशा मध्ये कालेज चा सर्व प्राध्यापक मोलाचा वाटा आहे आष्टी त्या कॉलेज मध्ये माझा आज सत्कार झाला त्याचे मला खुप अभिमान वाटत आहे या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज ने मला खुप काही शिकवले कॉलेज व प्राध्यापक यांचे मला कायम सहकार्य राहिले आपल्या ग्रामीण भागातील महाविद्यालय व विद्यार्थ्या मध्ये ही खूप गुणवत्ता आहे हे माझे कॉलेज आहे व माझ्या कॉलेज मधील विद्ार्थ्यांना माझे नेहमी सहकार्य राहील या यशा मधे महाविद्याल व प्राध्यापक यांचा खूप मोलाचा वाटा आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. भीमराव धोंडे व सर्व प्रशासन अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी डिप्लोमा इन इंजिनीयरिंग कॉलेज चे प्राचार्य संजय बोडखे, कृषी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साईनाथ मोहळकर, यांनी आपले मनोगत व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब शिंदे व आभार प्रा. सुनिल खिळदकर यांनी मानले यावेळी प्राध्यापक , प्राध्यापिका व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment