गंगाई फार्मसी कॉलेज कडा कॉलेजचे घवघवीत यश ९८%निकाल




आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :


आनंद चॕरीटेबल संस्था संचलीत गंगाई फार्मसी कॉलेज कडा ता .आष्टी,जि बीड .या कॉलेजचा निकाल ९८ टक्के लागला असून या सर्व उत्तीर्ण झालेल्या तसेच विषेश गुण प्रविण्य मिळालेल्या विदयार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब तसेच संस्थेचे डायरेक्टर डॉ.अजय (दादा) भीमराव धोंडे व श्री अभयराजे धोंडे यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राउत डी. बी., श्री. शिवदास विधाते, श्री. दत्तात्रय गिलचे, श्री. माऊली बोडखे, श्री. संजय शेंडे व प्राचार्य अशोक गदादे सर यांनी या यशाबद्दल सर्व विदयार्थ्यांचे तसेच या निकालात महत्वपूर्ण वाटा असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे हार्दीक अभिनंदन केले. या मध्ये द्वितीय वर्षात प्रथम कु.चव्हाण स्नेहल संजय ८९.१८% , दितीय कु.पवार अनुराधा भागवत ८५.३६% , तृतीय गावडे रामेश्वर मदन ८३.५५% घेवून प्रविन्य मिळवले . तसेच या वर्षी प्रथम वर्षात कु. महाडीक अर्चना नवनाथ ८३.४०% व्दीतीय कु.साप्ते किरण बाजीराव ८३.००% व तृतीय नन्नवरे कृष्णा धोंडीराम ८२.६०% घेऊन प्राविण्य मिळवले. ही उन्हाळी परीक्षा मे महिण्यामध्ये घेण्यात आली होती या यशाचे मुळ कारण सांगताना प्राचार्य अशोक गदादे सर म्हणाले वेगवेगळया प्लॅटफॉर्म द्वारे विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विदयार्थ्यांकडे दिलेले वैयक्तीक लक्ष, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन सिल्याबस प्रमाणे घेतलेले वेगवेगळे उपक्रम त्याचे व्हायवा , सराव परिक्षा, चाचणी परीक्षा, गेस्ट लेक्चर, एक्स्पर्ट लेक्चर तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे मेंटोर्स यांनीही विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. २०२२-२३ मध्ये गंगाई फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे प्रोग्राम घेण्यात आले यामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन प्रोजेक्ट. तसेच क्वीझ कॉम्पिटिशन, सेमिनार, पोस्टर प्रेझेंटेशन, पेशंट काउंसलिंग, फार्माकोव्हीगीलन्स, इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर, वेगवेगळ्या फिल्ड व्हीजीट मध्ये हाॕस्पीटल व्हीजीट, कम्युनीटी फार्मसी व्हीजीट, मेडीसीन गार्डन व्हीजीट, वाॕटर फिलट्रेशन प्लांट व्हीजीट तसेच विद्यार्थ्यांचे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन यामध्ये चार विद्यार्थ्यांनी आपला पेपरही पब्लिश केलेला आहे.तसेच पि.सी.आय. नविन सिल्याबस नुसार काॕलेज मध्ये माॕडेल फार्मसी स्टोर ही उभारले आहे व या मध्ये विद्यार्थ्यांनी सर्व प्रात्यक्षिक ही केले. हे या घवघवीत निकालामागचे कारण आहे तसेच विदयार्थ्यांना कॉलेजचे शिक्षक राहूल दानवे, मंगल लाटे, अनिकेत डाके, रागिणी सोळंके, साईनाथ पांढरे, काजल देवकर, भाऊसाहेब कणसे, श्री राऊत, विकास अनारसे, पल्लवी बोडखे , सुजीत अनारसे, सुप्रिया भडके, गणेश गांजूरे, संगिता राऊत, किशोर शिंदे यांचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभले असेही प्राचार्य अशोक गदादे यांनी सांगितले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी