येणाऱ्या निवडणुका वंचीत बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार.
वंचितच्या बहुजन आघाडीच्या मुलाखत मेळाव्याला ईच्छुकांची तुफान गर्दी.
गेवराई / प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद या निवडणुका आवघ्या दोन महिन्यावर येवुन ठेपल्या त्या अनुशंगाने दि. २८ गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बीड जिल्हा अध्यक्ष उध्दव खाडे, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर,भटके विमुक्त राज्य सदस्य भिमराव चव्हाण, बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालाजी जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गेवराई शहरात ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीला मोठी गर्दी झाली होती.
आज रोजी एकीकडे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला याच वेळी गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद या निवडणुका लढवु ईच्छीनारांच्या पत्रकार भवन गेवराई येथे घेण्यात आल्या यावेळी इच्छुकांनी मुलाखतीसाठी मोठी गर्दी केली होती. जवळपास २५ ईच्छुकांची उपस्थीत होते. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष खाडे म्हणाले की अत्तापर्यंत गेवराई तालुक्यातील पुढाऱ्यांनी मिळुनमिसळुन कारखाना, संस्था, आमदारकी, पंचायत समिती, बाजार समिती, सोसायट्या, ग्रामपंचायती वाटून आणि लुटून खाल्या यांना वेळीच आवरणे गरजेचे आहे यांची भुक बकासुरासारखी वाढतच आहे. आता यांच्या विरुध्द वंचित बहुजन आघाडी पूर्ण तारकदीनीशी सर्वांना सोबत घेवुन स्वबळावर लढणार. या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी गेवराईच्या वतिने तालुका आध्यक्ष पप्पु गायकवाड व सर्व तालुका पदाधिकारी यांनी केले होते,
यावेळी शहराध्यक्ष दस्तगीर शेख, किशोर भोले, सतिष प्रधान, आजय खरात, राजकुमार गायकवाड, श्रीकृष्ण खेडकर, सोमनाथ साळवे, पोद्दार, एकनाथ आडे, किशोर चव्हाण, सुनिल धोत्रे,ऋणीराज कांडेकर, ज्ञानेश्वर हवाले,बाबासाहेब शरणांगत, संजय शरणांगत, महादेव निकाळजे, प्रतिक गायकवाड, बाळासाहेब मुळुक, राजेंद्र आडसुळ, विठ्ठल हाराळे, सिधार्थ प्रधान, संदीप प्रधान, सह शेकडो कार्यकर्ते व ईच्छुक उपस्थित होते.
Comments
Post a Comment