घराच्या जागेच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा विनयभंगाच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता

अँड.महाजेर अली उस्मानी यांनी सबळ पुराव्या अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे

अंबाजोगाई प्रतिनिधी शीतलकुमार रोडे :- येथील २ रे जिल्हा व  सत्र न्यायालयात विशेष बाल लै. प्रकरण क्र. ०४/२०१६ सरकार वि. गौतम व इतर या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी १.गौतम बंकट भागवत व २.भारत बंकट भागवत,३.शारदा गौतम भागवत व ४. कलुबाई बंकट  भागवत रा. सुगाव ता.अंबाजोगाई जि. बीड यांची कलम ३५४(ब), ४५२,३२३, ५०४,५०६,३४ भा. दं. वि. सह ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा मधून मा. न्या.एस.जे.घरत  मॅडम यांनी सबळ पुराव्या अभावी दि.२५/०७/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, दि.०८/०३/२०१६ रोजी मौ. सुगाव ता.अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलगी ही तिचे आईवडील, भाऊ हे मजुरी साठी शेतात गेले असता ती एकटीच घरी असताना तिचे भावकितील आरोपी १.गौतम बंकट भागवत व २.भारत बंकट भागवत,३.शारदा गौतम भागवत व ४. कलुबाई बंकट  भागवत रा. सुगाव ता.अंबाजोगाई जि. बीड हे तिचे घरी आले व त्यांनी तुमचेकडील असलेली घराची जागा का देत नाहीत असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी गौतम भागवत याने फिर्यादी मुलीस वाईट हेतूने हाताला धरून तिचे अंगातील शर्ट फाडला त्यावेळी आरोपी शारदा हीचा गालाचा गालगुचा घेऊन खाली पाडले व इतर आरोपीनी तिचे पायास धरले होते व घराचा दरवाजा आतून लोटून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या अशा प्रकारची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी वरील आरोपी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन बर्दापूर ता.अंबाजोगाई येथे वरील कलमा अनव्ये गुन्हा दाखल करून प्रकरण सुनावणी साठी मा. न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.सदरील प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता फिर्यादी तर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पक्ष गुन्हा सिद्ध करू न शकल्यामुळे व आरोपींच्या वकिलाचा बचाव गृहीत धरून आरोपी १.गौतम बंकट भागवत व २.भारत बंकट भागवत,३.शारदा गौतम भागवत व ४. कलुबाई बंकट  भागवत रा. सुगाव ता.अंबाजोगाई जि. बीड  यांची कलम ३५४(ब), ४५२,३२३, ५०४,५०६,३४ भा. दं. वि. सह ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा मधून मा. न्या.एस.जे.घरत  मॅडम यांनी सबळ पुराव्या अभावी दि.२५/०७/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी