मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थकांना अवाहन



 सिल्लोड येथे येत्या रविवार रोजी होणार ऐतिहासिक सभा

विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी

        मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सिल्लोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे अवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांना केले आहे.
           
         मा. सर्वोच्च न्यायालयात अभ्यासपूर्ण व सक्षमपणे ओबीसी समाजाची बाजू मांडत, ज्येष्ठ विधिज्ञांची फौज उभारून ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच सिल्लोड - सोयगावच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल 31 जुलै रविवार रोजी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा ओबीसी समाज तसेच लोकनेते आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येणार असून सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लोकार्पण तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार बोलत होते.

      येत्या रविवार ( दि.31 ) रोजी सिल्लोड शहरातील नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सिल्लोडला वेळ देताच आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आयोजनाच्या जैय्यत तयारीला सुरुवात केली आहे. पावसाचे दिवस असल्याने नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात वॉटरप्रुप मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आज आमदार अब्दुल सत्तार व पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात पाहणी करून तयारीला सुरुवात केली. यावेळी व्यासपीठ ,महिला व पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्याअनुषंगाने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

        बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, युवासेनेचे धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, अक्षय मगर, प्रवीण मिरकर, संतोष धाडगे, संतोष खैरनार, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, सुधाकर पाटील , बेग चांद मिर्झा, शंकरराव खांडवे, शेख सत्तार हुसेन, रतनकुमार डोभाळ , आसिफ बागवान, सुनील दुधे, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, जुम्मा खा पठाण, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर , जितु आरके , मोईन पठाण , शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण आदींसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, जि.प. , पं. स.आजी माजी सदस्य, सरपंच, व्यापारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी